Mla- Rahul Aaher.  
नाशिक

 चांदवड तालुक्यावरील दुष्काळाचा शिक्का पुसण्यासाठी  आमदार डाॅ. राहुल आहेरांची धडपड 

सुभाष पुरकर : सरकारनामा ब्युरो

चांदवड : चांदवड तालुक्याची दुष्काळी म्हणून ओळख आहे, ही  ओळख पुसण्याचा विडाच आमदार डॉ.राहुल आहेर यांनी उचलल्याचे चित्र आहे. उन्हाळा सुरु होताच पाण्यासाठी वणवण येथे नित्याचीच असते. पण हे चित्र बदलण्यासाठी सध्या   49  गावांत श्रमदानातुन कामे प्रगतीपथावर आहेत. आमदार डाॅ. राहूल आहेर स्वतः श्रमदान करतातच मात्र रात्रीचा दिवस करून ते पाण्याच्या कामांचा  पाठपुरावा करीत आहेत . 

पाणी फौंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत 49 गावांची निवड झाली. यातील बावीस गाावंत श्रमदानातुन कामे सुरु आहेत. त्यासाठी खोदकामासाठी यंत्रे,  यंत्रासाठी डिझेल, श्रमदानासाठी लागणारे औजारे सगळ्या बारीक सारीक गोष्टीचे नियोजन करीत आहेत. जनतेला पाण्याचे महत्व पटवून देत गावोगावी प्रबोधन करत जलदुत ठरू पाहत आहे. 

सामान्यतः नेते विवाहांना हजेरी लावतात. मात्र अगदी दाट लग्नतिथी असताना डॉ.आहेरांनी सकाळपासून गोहरण, बोराळे, मालसाने, शिरसाने, उर्धुळ या गावांना अधिका-यांसह भेटी देवून आढावा घेतला. विविध ठिकाणी त्यांनी श्रमदानही केले. 

चांदवड दुष्काळी तालुका म्हणुन अख्या महाराष्ट्रात चांदवडची ख्याती आहे. येथील तहानलेल्या नागरीकांसाठी टॅंकर, जलसंधारण या पारंपारीक उपायांबरोबरच भुजल पातळीत वाढीसाठी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात श्रमदान सुरु आहे.  शेतकरी, महिला, विद्यार्थी हे कर्तव्य म्हणून तर कामाला लागले आहे, केवळ दिखावा न करता खुद्द आमदार डॉ. राहूल आहेर त्यात हिरीरीने सहभागी होतात.

श्रमदान करा असे सगळेच अधिकारी,पुढारी सांगतात. त्यात वेगळे ते काय? आमदार डॉ. राहुल आहेर मात्र हे सांगण्याआधी स्वतः श्रमदान करतात. त्यामुळे एरव्ही अशा उपक्रमांच्या वेळी बांधावर, पारावर बसुन गप्पा हाकणारेही त्यात उत्साहाने सहभागी झाल्याचे चित्र दिसते. डॉ. राहुल आहेर यांनी त्यासाठी मोठा पाठपुरावा केला आहे. प्रत्येक कामात त्यांचा सहभाग असतो. त्याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याची पातळी दीड मीटर वाढली. भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार शरद मंडलीक यांसह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने नागरीक या उपक्रमात सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT