Sinner MLA Rajabhau Waje Election Campaign
Sinner MLA Rajabhau Waje Election Campaign 
नाशिक

मतदारसंघातील आघाडीचे नेते आमदार राजाभाऊ वाजेंच्या प्रचारात

सरकारनामा ब्युरो

सिन्नर : महायुतीचे उमेदवार आमदार राजाभाऊ वाजे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराला सुरवात केली. शिवसेना, भाजप महायुतीचे कार्यकर्ते मतदारांच्या घरोघरी भेट घेत आहेत. मतदारसंघातील आघाडीचे नेते त्यांच्या प्रचारात उतरले आहेत. त्यामुळे मतदारसंघात त्यांचे उत्स्फूर्तपणे होणारे स्वागत चर्चेचा विषय ठरला आहे.

'आमदार नव्हे कार्यकर्ता' अशी प्रतिमा असलेले आमदार राजाभाऊ वाजे यांची सबंध मतदारसंघावर पकड आहे. गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषद गट, गण स्तरावर राजाभाऊ वाजे गटाने संघटनात्मक बांधनी केली. त्याचा परिणाम म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती या दोन्ही निवडणुकांत त्यांचे वर्चस्व आहे. त्याचा लाभ घेत त्यांनी केलेल्या मोर्चेबांधणीमुळे मतदारसंघातील शीतल सांगळे जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान झाल्या. मतदारसंघातील हे सोशल इंजिनिअरींग त्यांच्या चांगलेच पथ्थ्यावर पडले आहे. 

त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, युवानेते उदय सांगळे, पंचायत समिती सभापती भगवान पथवे, उपसभापती संगीता पावसे, गटनेते संग्राम कातकाडे, जिल्हा परिषद सदस्या वैशाली खुळे, वनिता शिंदे, वेणूताई डावरे, सुमन बर्डे, पंचायत समिती सदस्त जगन्नाथ पाटील भाबड, नारायणशेठ वाजे यांच्यासह सर्व पंचायत समितीच्या सदस्य हे आघाडीचे नेते त्यांच्या प्रचारात आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांनी पहिल्या दिवसापासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे.

गेल्या पाच वर्षांतील विकास कामांची माहिती प्रत्येक नेता, कार्यकर्ता मतदारांपर्यंत पोचवत आहे. गेल्या पाच वर्षांत शहरातील वाढीव हद्दीत अनेक विकासकामे आमदार वाजे यांनी आपल्या कार्यकाळात केली. यात सरदवाडी रोडवर वसलेल्या अनेक कॉलनींमधील रस्ते, गटारी, ग्रीन जिम यांचा समावेश आहे. अनेक रस्त्यांचे डांबरीकरण झाले असून, या परिसरातील नागरिकांना रस्त्यांमुळे दळणवळणास सुविधा झाली आहे. अनेक उपनगरांमधील उघड्या गटारी आता बंदिस्त झाल्याने रोगराईला आळा बसला आहे. सिन्नर शहरातील दीर्घकाळ रेंगाळलेले हे प्रश्‍न सुटले. त्यामुळे ते या निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे बनले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT