Balasaheb Sanap - Girish Mahajan
Balasaheb Sanap - Girish Mahajan 
नाशिक

भाजपचे शिष्टमंडळ म्हणाले....गिरीष महाजन साहेब इनकमींग थांबवा आम्ही आहोत ना!' 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : नाशिक पूर्वचे आमदार बाळासाहेब सानप म्हणजे मंत्री गिरीष महाजनांचे सर्वात विश्‍वासू शिलेदार होते. मात्र, सध्या माशी शिंकली अन्‌ आमदार सानप यांच्यावर महाजनांची मर्जी खप्पा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अन्य पक्षांतील इच्छुकांना प्रवेश देऊन उमेदवारीचे गिफ्ट देण्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुकांची चांगलीच सटकली आहे. त्यांनी थेट मुंबई गाठली. इनकमिंगला विरोध करीत, "महाजन साहेब उमेदवारीसाठी आम्ही आहोत ना!'' अशी विनवणी केल्याची चर्चा आहे. 

सध्या भारतीय जनता पक्षाची हवा आहे. त्यामुळे भाजपचाच उमेदवार विजयी होईल असा प्रत्येक इच्छुकांचा दावा आहे. यामुळे नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपच्या इच्छुकांची मोठी यादीच आहे. इच्छुक एव्हढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी मतदारसंघात आपल्या नावाचे फलकही लावले आहेत. नुकतीच महाराष्ट्र नवर्निमान सेनेचे नेते अॅड. राहुल ढिकले यांना भाजपमध्ये प्रेवश देऊन उमेदवारी देण्याचे घाटत असल्याची नवी चर्चा पसरली. त्यात किती तत्थ्य, वास्तव हे अद्याप उलगडलेले नाही. मात्र, या चर्चेने भाजपचे इच्छुक मात्र अस्वस्थ झाले आहेत. या नेत्यांच्या शिष्टमंडळाने थेट मुंबई गाठत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. 

या मतदारसंघात स्थायी समितीचे सभापती उध्दव निमसे, इंडिया सिक्‍युरीटी प्रेसचे नेते जगदीश गोडसे, सुनिल आडके, सुनील केदार, हेमंत धात्रक अशी इच्छुकांची मोठी यादी आहे. त्यामुळे नव्याने इनकमिंगला त्यानी विरोध केला. यावेळी एक इच्छुक म्हणाले, "महाजन साहेब नवे इनकमिंग थांबवा. तुम्हाला उमेदवारी हवे असतील तर आम्ही आहोत ना. विद्यमान आमदार नको असतील तर वंजारी समाजाचा उमेदवार असेल तर हेमंत धात्रक आहेत. मराठा समाजाचा हाव असेल तर उध्दव निमसे आहेत. ते चालवणार नसतील तर आमचा विचार करा. आम्ही शंभर टक्के विजयी होऊ.'' या बेधडक वक्तव्याने गिरीश महाजनांनी स्मित हास्य केले खरे मात्र काहीच प्रतिक्रीया व्यक्त केली नाही. शहरात सध्या इच्छुकांच्या शिष्टमंडळाची गिरीश महाजनांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT