नाशिक

भाजप अध्यक्ष अमित शहांकडून नाशिकच्या पूर्वा सावजीचे कौतुक

सरकारनामा ब्युरो

नाशिक : भाजप सरकारच्या संपर्क मोहिमेसाठी मुंबईच्या दौ-यावर असलेल्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांची नाशिकच्या पूर्वा सावजी हिने भेट घेतली. यावेळी तिने पक्षाच्या प्रचारासाठी तयार केलेली पुस्तिका शहा यांना दिली. त्याविषयी शहा यांनी तिच्या उफक्रमाचे कौतुक केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने राबविण्यात येत असलेल्या संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत पक्षाध्यक्ष अमित शहा बुधवारी (ता. 6) मुंबईत आले होते. त्या वेळी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'संबंधी पूर्वा सावजीने त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रभारी सरोज पांडे, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी शहा यांच्यासमवेत पक्षाच्या विशेष कामकाजासंबंधी चर्चा केली. त्या वेळी पूर्वा सावजी व श्री. शहा यांची भेट झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT