Chagan_Bhujbal_
Chagan_Bhujbal_ 
नाशिक

छगन भुजबळ भाजपला विचारताहेत , अरे कुठं नेऊन ठेवलं नाशिक माझं !

सरकारनामा ब्युरो

नाशिक: "विकासाच्या शर्यतीत नाशिक मागे पडु लागले आहे. नागपूरचा विकास झाला याचा आनंद आहे. मात्र नाशिकच्या विकासातील घसरण चिंताजनक बाब आहे. नाशिकच्या पीछेहाटीला सत्ताधारी भाजप-शिवसेना जबाबदार आहे. त्यांनी "कुठं नेऊन ठेवलं नाशिक' असं म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे," असा टोला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला लगावला आहे .  

 जागतिक विचारसंहिता असलेल्या सिटी मेयर्स फाउंडेशनच्या नोव्हेंबर 2011 मधील सर्वेक्षणानुसार 'वाइन कॅपिटल ऑफ इंडिया' देशात चौथ्या क्रमांकावर, तर जगात सोळाव्या स्थानी होते. मात्र, ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍सच्या अहवालानुसार नाशिकची जागा आता नागपूरने पटकावली आहे. यासंबंधाने श्री. भुजबळ म्हणाले, " एकेकाळी विकासाची गंगा वाहणाऱ्या आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या नाशिक शहराला दृष्ट लागली आहे. गेल्या चार वर्षांपासून नाशिकच्या विकासाचा वेग इतका मंदावला आहे. पुढील काळात नाशिककरांना विविध समस्यांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत."

श्री. भुजबळ पुढे म्हणाले, " राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात नाशिक शहर व जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक मोठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प साकारण्यात आले. पर्यटनवृद्धीसाठी मी पाठपुरावा करून निर्माण केलेले गंगापूर धरण परिसरातील मेगा पर्यटन संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोट क्‍लब, मनोरंजन पार्क, ग्रेप पार्क रिसॉर्ट, साहसी क्रीडासंकुल, कलाग्राम, अंजनेरी येथील ट्रेकिंग इन्स्टिट्यूट यांसह पर्यटनाच्या दृष्टीने अनेक प्रकल्प 2014 पर्यंत साकारण्यात आले. "


" मात्र, सध्या हे प्रकल्प धूळखात पडले आहेत. 'न भूतो न भविष्यति' असे हे प्रकल्प आहेत. हे प्रकल्प सुरू करण्यासाठी सत्ताधारी सरकारला वेळ नाही", अशीही टीका श्री. भुजबळ यांनी केली.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT