Chhagan Bhujbal remembers the old photo
Chhagan Bhujbal remembers the old photo 
नाशिक

छगन भुजबळ यांना झाली त्या जुन्या फोटोची आठवण

संपत देवगिरे

नाशिक : शिवसेनाप्रमुख (कै) बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त देशभर त्यांना श्रध्दांजली वाहिली जात आहेत. यानिमित्त् ठाकरेंचे जुने सहकारी असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ते मुुंबईचे महापौर असतांनाचा 40 वर्षांपूर्वीचे छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांना श्रंध्दाजली वाहण्यासाठी शहरभर फलक, शिवसेनेचे झेंडे लावण्यात आले आहे. फेसबुक, व्हाटस अव, ट्विटर सगळीकडेच बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी, फोटो, श्रध्दांजीली वाहिली जात आहे. त्यात एकेकाळी शिवसेनेचे आक्रमक नेते असलेल्या छगन भुजबळ यांचे ट्वीट चर्चेचा विषय आहे. श्री. भुजबळ शिवसेनेचे महापौर व आमदार असतांनाचे हे छायाचित्र आहे. त्यासोबत पुढील श्रद्दाजली वाहण्यात आली आहे.

मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व, तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे `हिंदुह्दयसम्राट` शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मतीस विनम्र अभिवादन, असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. भुजबळ यांनी आज ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT