Dada Bhuse initiative to Send Vegetable Packs to Mumbai
Dada Bhuse initiative to Send Vegetable Packs to Mumbai 
नाशिक

कृषीमंत्री दादा भुसेंचे मुंबईकरांसाठी सात टन भाजीपाल्याचे घरपोच गिफ्ट

सरकारनामा ब्युरो

मालेगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीत गर्दी टाळणे महत्वाचे आहे.  तथापी राज्यात विविध बाजार समिती व भाजीबाजारात होणारी गर्दी प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. त्यातून वाशी व मुंबईतील दादरचा बाजारही बंद करण्यात आला. त्यासाठी घरपोच भाजीपाल पॅक पोहचविण्याचा प्रायोगिक उपक्रम राज्याचे कुषीमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून आकाराला आला आहे. 'ना नफा ना तोटा' तत्वावर झालेल्या या प्रयोगामुळे शेतकरी व ग्राहक दोघांचे समाधान होणार आहे. 

घरपोच आठ भाजीपाला पॅक या प्रयोगाचा पहिला प्रयत्न म्हणून रविवारी ठाण्याला सात टन सुमारे अकराशे भाजीपाल्याचे पॅक श्री. भुसे यांच्या हस्ते रवाना करण्यात आले. यासाठी बाजार समितीचे भाजीपाल खरेदीदार आडत व्यापारी देवा वाघ यांनी मोलाचे सहाय्य केले.  श्री. वाघ यांनी समितील कसमादे भागातून आलेला भाजीपाला व फळभाज्यांची शेतकरीं कडून लिलावात खरेदी केली. समितीतील आडत शेड मध्ये कामगार व काही कार्यकर्त्याच्या मदतीने शेतमालातील आठ विविध प्रकारच्या भाज्यांचे प्रत्येकी साडेपाच ते सहा किलो वजनाचे अकराशे पॅकेट तयार करण्यात आले. 

ट्रकमधून हा भाजीपाला आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे रवाना करण्यात आला. तेथे ठाणे परिसरात प्रती पॅकेट शंभर रूपये याप्रमाणे ना नफा ना तोटा तत्वावर त्याची विक्री होणार आहे. यासाठी श्री. भुसे, समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, श्री. वाघ, युवासेनेचे विस्तारक अविष्कार भुसे, राजू अलिझाड, भरत देवरे, राजेंद्र पवार व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

पाकीटात या आहेत भाज्या.

कांदा, बटाटा, टोमॅटो, सिमला मिरची, शेवगा, हिरवी मिरची, कोबी व काकडी. 

आज प्रायोगिक एक ट्रक पाठविला. येथील बालाजी लाँन्समध्ये सोशल डिस्टन्सिंग राखून आज आणखी पॅकींग करू. सोमवारी मुलुंड, ठाणे, मुंबई, वरळी आदी भागात काही ट्रक पाठविण्याचे नियोजन आहे. प्रयोग यशस्वी झाल्यास सर्वांच्या सहकार्याने तो निरंतर ठेवण्याचा प्रयत्न करू - दादा भुसे, कृषीमंत्री.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT