Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते डॉ. अपूर्व हिरे बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. डॉ. हिरे हे शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे राजकीय विरोधक आहेत. या दोन्ही नेत्यांत सतत सुडाचे राजकारण सुरू असते. या पार्श्वभूमीवर डॉ. हिरे भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत.
माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला मालेगावमध्ये मोठा धक्का बसणार आहे. दुसरीकडे सत्ताधारी महायुतीत विसंवादाच्या राजकारणाला नव्याने फोडणी मिळणार आहे. डॉ. हिरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी थेट संपर्क करीत पक्षप्रवेश केला आहे.
गेले काही दिवस डॉ. हिरे यांच्या भाजप (BJP) प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. त्याला त्यांच्या राजकीय विरोधकांनी मोठा शह देण्याचा प्रयत्न केला आहे. मंगळवारी डॉ. हिरे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या विरोधात पोलिसात फसवणूक आणि आर्थिक घोटाळ्याचा गुन्हा दाखल झाला आहे. महायुतीत प्रवेश करू नये राजकीय संरक्षण मिळणार की नाही असा संमिश्र संदेश यातून हिरे यांच्या विरोधकांनी दिला आहे.
डॉ. हिरे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गेल्या दोन वर्षात सहा खटले दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक संस्थेत नोकरी देण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली आहे. पैसे घेऊनही नोकरी मिळाली नाही म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारींचा त्यात समावेश आहे. तक्रार करणारे अतिशय सामान्य लोक असल्याने यामागे राजकीय वरदस्त कोणाचा हे लपून राहिले नाही.
या पार्श्वभूमीवर डॉ. हिरे यांनी आपले राजकीय विरोधक आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने हे षडयंत्र रचण्यात आले आहे. कितीही षडयंत्र रचले आणि गुन्हे दाखल झाले तरी त्याला सामोरे जाण्याचे आपली तयारी असल्याचा दावा हिरे यांनी केला आहे.
सध्या डॉ. हिरे आणि त्यांचे बंधू अद्वय हिरे दोघेही जामीनावर आहेत. त्यातच आणखी एका नव्या गुन्ह्याची भर पडली आहे. हिरे आता भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात होते. म्हणजेच ते सत्ताधारी पक्षातील एका गटाकडून दुसऱ्या गटाकडे जाणार आहेत. अजित पवार यांच्यासोबत असूनही त्यांच्या मागे खटल्यांचा ससेमीरा थांबला नव्हता. भाजपमध्ये प्रवेश केल्यावर तरी त्यांची पोलिसांच्या कारवाईपासून सुटका होणार का? याची चर्चा रंगली आहे.
शिक्षणमंत्री दादा भुसे आणि हिरे यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला आहे. मात्र, आता भुसे यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि भाजपचे डॉ. अपूर्व हिरे यांच्याशी एकाच वेळी संघर्ष करावा लागणार आहे. हिरे यांच्या विरोधक सत्तेत आणि मंत्री असल्याने हिरे यांचा निभाव लागतो की दादा भुसे यांना भाजपवर घालते याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.