Devendra Fadanavis
Devendra Fadanavis 
नाशिक

युतीच्या बंडखोरांना कुणाचेही बळ नाही, त्यांच्याकडे लक्ष देवू नका : देवेंद्र फडणवीस

सरकारनामा ब्युरो

जळगाव : राज्यात भाजप-शिवसेना युतीचे आहेत आहेत, मात्र काही बंडखोरही उभे आहेत. त्यांना कुणीही बळ देत नाही. त्यामुळे या बंडखोराकडे लक्ष देता केवळ भाजप-सेना युतीच्या अधिकृत उमेदवारांनाच विजयी करा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथील जाहीर सभेत बोलतांना केले.

जळगाव येथे विमानतळानजिक असलेल्या मैदानावर युतीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजप-सेना युतीतर्फे अधिकृत उमेदवार उभे आहेत. मात्र, काही ठिकाणी युतीत बंडखोरी झाली आहे. या बंडखोरांना कुणाचीही ताकद नाही. त्यांच्याकडे लक्ष न देता, जनतेने भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच विजयी करावे. असे आवाहनही त्यांनी केले. गेल्या पाच वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून तब्बल 60 हजार कोटी रूपयांची मदत शासनाने केली असल्याचा दावाही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT