Dhangar Community Met Cm Uddhav Thackeray for Prakash Shedge Ministry.
Dhangar Community Met Cm Uddhav Thackeray for Prakash Shedge Ministry. 
नाशिक

पंकजा मुंडे समर्थक प्रकाश शेंडगेंच्या मंत्रीपदासाठी धनगर समाजाचे उद्धव ठाकरेंना साकडे

सरकारनामा ब्युरो

नाशिक : धनगर समाजाचे आरक्षण आणि मागण्यांबाबत या समाजाच्या नेत्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. सरकारमधील सहकारी पक्षांशी याविषयी चर्चा करून त्यावर निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे आणि प्रकाश शेंडगे यांना मंत्रिमंडळात घेऊन धनगर समाजाचा सन्मान करावा, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा घोंगडी आणि शाल देऊन सत्कार केला. घोंगडीच्या सत्काराने मुख्यमंत्री बेहद्द खुश झाले.

विविध मागण्यांसदर्भात शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळातर्फे हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख धनंजय बुचूडे ,लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी ढेपले, नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर आदींसह राज्यातील प्रमुख समाज बांधव हजर होते. धनगर समाजातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काठी आणि घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला.समाजाच्या मागण्यांबाबत सहभागी पक्षांशी समन्वय साधून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT