Congress NCP Alliance Dhule Candidate Kunal Patil
Congress NCP Alliance Dhule Candidate Kunal Patil 
नाशिक

शेतकऱ्यांसह बेरोजगार तरुणांच्या हक्कासाठी विधिमंडळात लढेन : कुणाल पाटील

निखिल सूर्यवंशी

धुळे : धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत साथ मिळाल्यास शेतकऱ्यांसह बेरोजगार तरुणांच्या हक्कासाठी विधिमंडळात लढेल. यापूर्वी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी विधिमंडळात आवाज उठविल्यावर निलंबनाची वेळ आली होती. यापुढेही शंभरवेळा निलंबित झालो तरी चालेल पण या घटकांचे प्रश्‍न तडीस नेल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी मांडली.

धुळे ग्रामीण मतदारसंघातील कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी विविध नेत्यांच्या माध्यमातून सभांवर भर दिला. त्यांचे वडील माजी कृषी मंत्री रोहिदास पाटील, मातोश्री लता पाटील, पत्नी अश्‍विनी पाटील, बंधू विनय पाटील प्रचाराच्या मैदानात उतरले होते. त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी, गावे पिंजून काढण्यावर भर ठेवला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची सभा झाली. महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या साथीने उमेदवार आमदार पाटील यांनी प्रचार केला.

आपल्या प्रचाराबाबत ते म्हणाले, "मोदी लाट असूनही गेल्या निवडणुकीत कार्यबळावर मतदारसंघात निवडून आलो. विरोधी आमदार असतानाही मतदारसंघात रस्ते, पाणीपुरवठा योजना, वीजेसह सिंचनाचे प्रश्‍न मार्गी लावले. जवाहर कृतज्ञता ट्रस्टच्या माध्यमातून 102 गावांमध्ये नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम केल्याने हजारो एकर क्षेत्र सिंचनाखाली आले. संधी मिळाल्यास उर्वरित गावे सिंचनयुक्त केले जातील. रोजगारासह विविध प्रश्‍न मार्गी लावले जातील. भाजप सरकार भूलथापा देण्यात गुंतलेले आहे. ते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ शकले नाहीत. बेरोजगार तरुणांचे प्रश्‍न सोडवू शकले नाहीत. असे प्रश्‍न सोडविण्याची क्षमता कॉंग्रेस महाआघाडीत आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी पाठबळ द्यावे. धुळे ग्रामीण मतदारसंघ बागायतदार करायचा असून राहिलेली विकास कामे मार्गी लावायची आहेत. त्यासाठी पाठबळ दिले जावे, असे मुद्दे हाती घेत उमेदवार पाटील आणि महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेतून लक्ष वेधले.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT