Eknath Khadse Sprayed Disinfectants in Muktainagar
Eknath Khadse Sprayed Disinfectants in Muktainagar 
नाशिक

खडसेंनी स्वतः ट्रॅक्टर चालवत केली जंतूनाशकांची फवारणी

सरकारनामा ब्युरो

जळगाव : माजी मंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर येथे स्वतः ट्रॅक्टर चालवत गावात जंतुनाशक फवारणी केली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आज ही फवारणी केली. आपल्या कोथळी गावात त्यांनी ही फवारणी केली. त्याचे छायाचित्र त्यांनी आपल्या फेसबूक पेजवरुन प्रसिद्ध केले आहे. 

केवळ जंतूनाशकांची फवारणीच नव्हे तर येथे राष्ट्रीय महामार्गावर अन्नछत्राचीही उभारणी खडसे यांनी केली आहे. माझ्या पेन्शनचे एक लाख रुपये तसेच अतिरिक्त रक्कम टाकून उभारलेल्या या अन्नछत्रात मुंबई - सुरत येथून आपल्या गावाकडे पायी निघालेल्या लोकांना, महामार्गावरून जाणाऱ्या ट्रक चालकांना तसेच परिसरातील गरजू व गरीब नागरिकांना जेवण वाटप करण्यात येत आहे, अशी माहिती खडसे यांनी दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT