People Still remind my work as Leader of Opposition Say Ekanath Khadase
People Still remind my work as Leader of Opposition Say Ekanath Khadase 
नाशिक

विरोधी पक्षनेता म्हणून माझ्या कामाचा ठसा : एकनाथ खडसे (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो

जळगाव : मी मंत्री म्हणूनही काम केलेले आहे, परंतु जनतेकडून आपल्याला लग्नपत्रिका येतात त्यावर 'माजी विरोधी पक्षनेता'असा उल्लेख असतो.त्यामुळे आपल्या विरोधी पक्षनेता म्हणून जनतेच्या मनात ठसा आहे. असे मत राज्याचे माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

जळगाव येथील निवास्थानी खडसे पत्रकाराशी बोलत असतांना, एक नागरिकांने त्यांना लग्नपत्रिकेव्दारे लग्नाचे निमत्रंण दिले, त्यावर माजी विरोधी पक्षनेता असा उल्लेख होता. त्याचा संदर्भ देवून ते म्हणाले, की पहा आठवणीत राहतो तो कोण? माजी विरोधी पक्षनेता. आपण मंत्री म्हणूनही काम केलेले आहे. मात्र, परंतु आपले विरोधी पक्षनेता म्हणून केलेले काम जनतेच्या लक्षात आहे.याचा अर्थ आपण विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम केले हे दिसून येत आहे.

पक्ष बदलाचा विचार नाही

पक्षबदलाच्या चर्चेबाबत खडसे म्हणाले, आपला पक्षबदलाबाबत कोणताही विचार नाही. त्याबाबतच्या चर्चा निराधार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT