नाशिक

गिरीश महाजन यांचा जळगाव- जामनेर एसटीतुन प्रवास

राजेश सोनवणे

जळगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज (ता. १) एसटीतुन प्रवास केला. तसेच बसमध्ये येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत देखील केले.

राज्य परिवहन महामंडळचा ७१ वा वर्धापन दिन जळगाव विभगकडून साजरा करण्यात आला. एसटीचा वर्धापन दिन असल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी ८ वाजता आपल्या शासकीय वाहनाऐवजी बसने जळगाव ते जामनेर असा प्रवास केला. बस प्रवास करण्यापूर्वी महाजन यांनी जळगाव बस आगारात पाहणी केली. यावेळी जळगाव आगाराच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. जळगाव बस आगारात एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ते जळगाव-जामनेर बसने जामनेरला जाण्यासाठी निघाले. 

प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी महाजन यांनी बसचे चालक व वाहकाचा सत्कार केला. 
मंत्री आपल्यासोबत बसने प्रवास करणार असल्याचे पाहून बसमधील इतर प्रवाशांना सुखद धक्का बसला. जामनेरला जाण्यासाठी बसने निघालेल्या गिरीश महाजन यांच्यासोबत असलेल्या ९ सहकाऱ्यांनी बसच्या महिला वाहकाकडून तिकीट देखील काढून घेतले. यावेळी महिला वाहकाला गिरीश महाजन यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT