नाशिक

महाजन घेणार आदिवासींसाठी सर्वात मोठे आरोग्य शिबिर 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने येत्या डिसेंबर महिन्यात आदिवासी भागासाठी अटल महा ग्रामीण आरोग्य शिबिर होणार आहे.  

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतल्याने वैद्यकीय विभागांनीही झोकुन देऊन काम सुरु केले आहे. आदिवासी रुग्णांसाठी हे सर्वात मोठे शिबिर असेल असा दावा करण्यात आला आहे. 

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून येत्या 2 डिसेंबरला कळवण येथे अटल महा ग्रामीण आरोग्य शिबिर होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी भागातील गरीब व गरजू रुग्णांना त्यांच्या भागातच तज्ञ डॉक्‍टरांमार्फत मोफत तपासणी व उपचार केले जातील. कळवण लगतच्या सुरगाणा, दिंडोरी ,सटाणा व देवळा तालुक्‍यातील रुग्णांना त्याला लाभ होईल. शिबिराच्या प्राथमिक नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार आज आढावा बैठक झाली. 20 नोव्हेंबर पासून रुग्णांची पूर्वतपासणी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय ,तसेच उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत होणार आहे. यापुर्वी नाशिक, नंदुरबार यांसह उत्तर महाराष्ट्रात ही शिबिरे झाली आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT