jalgaon airport gets night landing permission
jalgaon airport gets night landing permission 
नाशिक

जळगाव विमानतळावर नाईट लॅंडींगला मंजुरी : आमदार गिरीश महाजन

सरकारनामा ब्युरो

जळगाव : जळगाव विमानतळावर विमानांचे "नाईट लॅंडींग' व्हावे यासाठी गेले अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते. त्याला केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. त्याबाबतचे पत्रही प्राप्त झाले असल्याची माहिती आमदार गिरीश महाजन यांनी दिली. खासदार उन्मेश पाटील, रक्षा खडसे यांनी दिल्लीत विशेष पाठपुरावा केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जळगाव विमानतळावरून चोवीस तास विमान सेवा सुरू व्हावी यासाठी "नाईट लॅंडींग' परवानगी देण्यात यावी यासाठी केंद्र शासनाच्या अख्यातरीत असलेल्या विमानतळ प्राधीकरणाकडे मागणी करण्यात येत होती. त्याला यश आले असल्याची माहिती आमदार महाजन यांनी दिली. ते म्हणाले, की जिल्ह्याचे खासदार उन्मेश पाटील, रक्षा खडसे यांनी दिल्लीत केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. केंद्रीय विमानउड्डयन मंत्री यांचीही त्यांनी भेट घेतली होती. या शिवाय आपणही त्याबाबत वेळोवेळी दिल्लीत त्याचा पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे.

मंजुरीचे पत्र प्राप्त
विमानतळ प्राधिकरणाने आता मंजुरी दिलेली आहे. याबाबतचे पत्र आज प्राप्त झाले आहे. देशभरातील 28 विमानतळात जळगाव विमानतळालाच "नाईट लॅंडीग'ची परवानी मिळाली आहे, शिर्डी विमानतळाला दिवसाची परवानगी मिळालीा आहे. असेही आमदार महाजन यांनी सांगितले.

विमानसेवा आता 24 तास
जळगाव विमानतळावर आता रात्रीही विमाने थांबू शकणार असल्याने जळगावातून आता चोवीस तास विमानसेवा उपलब्ध होणार असल्याचे आमदार महाजन यांनी सांगितले. लवकरच जळगाव येथून पुणे येथेही विमानसेवा सुरू होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT