नाशिक

महावीर पतसंस्था संचालकांच्या मालमत्ता जप्तीची लवकरच कारवाई - खडसे  

सरकारनामा ब्युरो

जळगाव : जळगाव जिल्हा बॅंकेकडून महावीर पतसंस्थेने घेतलेल्या कर्जाची फेड न केल्यामुळे त्याच्या वसुलीसाठी सहकार न्यायालयाने पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा बॅंकेतर्फे ही कारवाई लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे संचालक, आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली. 

याबाबत माहिती देतांना त्यांनी सांगितले, कि महावीर पतसंस्थेने जिल्हा बॅंकेकडून सन 2002 मध्ये 8 कोटी रूपये कर्ज घेतले आहे.त्यावेळी संस्थेच्या संचालकांनी कर्ज वसुलीचे हमीपत्र करून दिलेले आहे. या कर्जवसुलीसाठी जिल्हा बॅंकेने महावीर अर्बन पतसंस्थेच्या संचालकाविरूध्द 17 कोटी 58 लाख 33हजार 83 रूपयाच्या कर्ज वसुलीसाठी सहकार न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यानुसार न्यायालयाने संचालक मंडळावर कर्ज व त्यावरील व्याज वसुलीची जबाबदारी ठेवली आहे. त्यानुसार महावीर पतसंस्थेचे संचालक मनीष ईश्‍वरलाल जैन, सुरेद्र नथमलजी लुंकड, सुभाष सागरमल साखला, महेंद्र दुर्लभजी शाह, सुरेंद्र बन्सीलाल जैन, अजित बन्सीलाल कुचेरीया, तुळशीराम खंडू बारी, सौ.सपना अश्‍वीन शाह, सौ.अपना अजय राका, सुरेशकुमार आनंदराज टाटीया यांच्या मालमत्तावर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. न्यायालयाचे आदेश प्राप्त होताच बॅंकेतर्फे कारवाई सुरू करण्यात येणार आहे
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT