girish mahajan, ulahs patil, gulabrao deokar 
नाशिक

उल्हास पाटील, गुलाबराव देवकर आणि आता गिरीश महाजन : नेत्यांचा असाही जळगाव पॅटर्न

आता आरोग्य सेवेचे वाढते महत्व लक्षात घेऊन राजकारणी त्याकडे वळले आहेत.

कैलास शिंदे

जळगाव : कोरोंना संसर्गरोगामुळे संपूर्ण जीवनमान बदलले आहे. नागरिकांना आता आरोग्याचे महत्व अधिक पटू लागले आहे. आगामी काळातील हेच लक्षात घेवून राजकारण करणाऱ्या नेत्यांनीही आपली समाजकारणाचा दिशा याकडेच वळवली आहे.

राजकीय क्षेत्रात कार्य करताना जनतेच्या गरजा ओळखून राजकारण करावे लागते. या आधीच्या राजकीय पिढीने सहकाराच्या माध्यमातून साखर कारखाने, बॅंका काढून त्या माध्यमातून जनतेशी राजकारण्यांनी जवळीक केली. त्यानंतर हायस्कूल, कॉलेज, इंजिनीरिंग, मेडीकल कॉलेज सुरू करण्यात आले. मात्र त्या काळात रुग्णालय सुरू करण्याबाबत फारसा विचार झाला नाही. मात्र आता आरोग्य सेवेचे वाढते महत्व लक्षात घेऊन राजकारणी त्याकडे वळले आहेत.

जळगाव जिल्ह्याचा विचार केल्यास माजी खासदार व काँग्रेस नेते डॉ. उल्हास पाटील यांनी ही बाब वीस वर्षे अगोदरच हेरली होती. त्यांनी खासदारकीची उनेपुरे केवळ तेरा महिने मिळाले. त्यातही ते त्यावेळीं काँग्रेस विरोधी पक्षात होते. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारकडून त्यावेळी त्यांनी त्यांची संस्थेच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज मजूर करून आणले. त्याच गोदावरी मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून ते रुग्ण सेवा देत आहे. कोविडकाळात त्यांनी स्वतंत्र कोविड हॉस्पीटल सुरू केले.

राष्ट्रवादीचे देवकरांनीही रुग्णालय उघडले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर ही आता रुग्णसेवेत उतरले आहेत. त्यांचे इंजिनिअरिंग कॉलेज आहेच. त्याच ठिकाणी त्यांनी अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले आहे.त्याची नुकतीच सुरुवातही झाली आहे. आता हे हॉस्पीटल शासनाचे जिल्हा रुग्णालय म्हणून कार्यरत आहे. कोरोना काळात या ठिकाणी नॉन कोविड रुग्णांसाठी सुविधा झाली. शिवाय याच ठिकाणी सत्तर बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्य आले आहे.

गिरीश महाजनही त्याच वाटेवर

भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांची आरोग्यसेवक म्हणून संपूर्ण राज्यात ओळख आहे. जिल्ह्यातील रुग्णांना मुंबईत चांगली उपचार सुविधा ते उपलब्ध करून देत असतात. मात्र आता त्यांनी त्यांच्या जामनेर येथे मल्टिपर्पज हॉस्पिटलची उभारणी केली आहे. या ठिकाणी सर्व उपचाराच्या सुविधा आहेत. या हॉस्पिटलचा शुभारंभ  तेरा आॅक्टोबर रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. या माध्यमातून आमदार महाजन यांचे आरोग्य सेवेतील नवे पाऊल पडले आहे. याच ठिकाणी ते नर्सिंग कॉलेज सुरू करणार आहेत. त्यामळे या ठिकाणी शिक्षणाची सुविधाही होणार आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT