Devendra Phadanavis
Devendra Phadanavis  
नाशिक

'वॉशिंग पावडर' नव्हे आमच्याकडे 'डॅशींग रसायन' : देवेंद्र फडणवीस 

सरकारनामा ब्युरो

जळगाव : भारतीय जनता पक्षाकडे कोणतेही वॉशिग पावडर नव्हे तर 'डॅशिंग रसायन'आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. भुसावळ येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

महाजनादेश यात्रा सद्या जळगाव जिल्ह्यात आहे. भुसावळ येथे मुख्यमंत्री मुक्कामी होते. आज सकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर भ्रष्टाचारी धुवून निघतात, भाजपकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे. असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. 

त्याला उत्तर देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''त्यांच्याकडे भ्रष्टाचारी लोक आहेत, हे त्यांनी मान्य केल्याचे दिसत आहे. मात्र आमच्याकडे वॉशिंग पावडर नव्हे तर 'डॅशिंग रसायन' आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे व्हीजन आहे. 'सब समाजको साथ लिए चलना' हे त्यांचे कार्य आहे. त्या मुळेच जनतेचा आमच्या पक्षावर विश्‍वास आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT