नाशिक

विद्यार्थ्यांच्या ठिय्यात काँग्रेस, मनसेचे झेंडे फडकल्याने आदिवासी विभागाला धडकी 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : आदिवासी आयुक्‍तालयावर शांततेत येत असलेला आदिवासी विद्यार्थ्यांचा पुणे- नाशिक पायी मोर्चा पोलिसांनी बळाचा वापर नांदूरशिंगोटेत अडविला. त्यानंतर राज्यभरातील विद्यार्थी आज थेट आदिवासी आयुक्तालयाच्या मुख्यालयात थकडले. त्यांच्या संघटीत आवाजात युवक काँग्रेस आणि मनसेनेही सुर मिसळला. त्यामुळे व्यापक झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाला अक्षरशः धडकी भरली. 

आज सकाळी विविध भागातुन आलेल्या या विद्यार्थ्यांनी आयुक्तालयाच्या आवारात ठिय्या दिला. पाहता पाहता मोठी गर्दी झाली. दोन दिवस प्रश्‍न गाजत असल्याने आज युवक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, नगरसेवक राहूल दिवे, आकाश छाजेड यांसह पदाधिकाऱ्यांना आंदोलनाला पाठीबा देत आयुक्तांना निवेदन दिले. चर्चा केली. त्यानंतर मनसे विद्यार्थी आघाडीचे दीपक चव्हाण यांनीही पाठिंबा देत निवेदन दिले. मदन पथवे, कैलास वसावे, सतीश पेदाम, लकी जाधव या विद्यार्थ्यांनी प्रभारी आयुक्तांशी चर्चा केली. राजकीय पक्षांनी पाठींबा दिल्याने सुरु झालेल्या घोषणांनी परिसर दणाणला. त्यामुळे प्रशासनालाही धडकी भरली. खासदार, आमदार, मंत्र्यांनीही या आंदोलनाची माहिती घेतली. 

संतप्त विद्यार्थी आंदोलनावर ठाम होते. पोलिसांनीही सोमवारपासूनच चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली. मात्र सकाळी अनपेक्षीतपणे विद्यार्थ्यांची संख्या वाढली. पावसाळी आधिवेशनातदेखील हा मुद्दा गाजल्याने प्रभारी आदिवासी आयुक्त किरण कुलकर्णी यांनी शासनाची बाजू मांडली. या प्रश्‍नावर मंगळवारी विविध राजकीय पक्ष, विद्यार्थी आणि आदिवासी संघटनांकडून या मोर्चाला पाठिंबा देत आयुक्तांना निवेदन देऊन निषेध नोंदवत चर्चा केली. आदिवासी विकासतर्फे राज्यात चालविल्या जाणाऱ्या शासकीय आदिवासी वसतिगृतील विद्यार्थ्यांना भोजनासंदर्भात लागू करण्यात आलेली 'डीबीटी' योजना रद्द करावी. जुन्या पद्धतीनेच शासनाने खानावळ सुरू करत सकस आहार विद्यार्थ्यांना पुरवावा यावर विद्यार्थी ठाम होते. 

'डीबीटी' ची सक्ती नव्हे : कुलकर्णी 
राज्यात भोजनासंदर्भात राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेली डीबीटी योजना जिल्हास्तरावर असलेल्या 120 वसतिगृहांमध्येच प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्याची सक्ती नाही. सचिव स्तरावर चर्चा करुन निर्णय घेऊ - किरण कुलकर्णी, प्रभारी आयुक्त. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना MNS

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT