Nashik MNS Dilip Datil Dance
Nashik MNS Dilip Datil Dance 
नाशिक

मनसे नेते दिलीप दातीरांचा 'बाला' डान्स 'हाऊसफुल्ल 4' प्रमाणे पोहोचला घरोघरी

प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अन्‌ नाशिक पश्‍चिम मतदारसंघाचे उमेदवार, नगरसेवक दिलीप दातीर हे देखील हरहुन्नरी व्यक्तीमत्व आहे. त्यांनी दिवाळीला आलेल्या भाचे, मुले यांच्यासमवोत 'हाऊलफुल्ल 4' चित्रपटातील प्रचंड गाजत असलेले अक्षय कुमारचे 'बाला ओ बाला' या गाण्यावर जोरदार नृत्य केले. ते सोशल मिडीयावर व्हायरल केले. त्याला हजारो लाईक्‍स मिळाल्याने ते चर्चेत आले आहेत.

कलाकार यशस्वी झाले, नावारुपाला आले की राजकारणात जातात. निवडणुकांत उमेदवारी करतात. अनेक राजकारणीही आपले कलागुण जोपासणारे असतात. वेळ असेल, संधी मिळेल तेव्हा ते हा गुण सादरही करतात. दिवाळीच्या सणानिमित्त आप्तस्वकीय अन्‌ बच्चे मंडळी एकत्र आले होते. दातीर यांनी त्यांच्या समवेत दिवाळी साजरी करतांना हे नृत्य केले. आक्रमक राजकीय नेता अशी प्रतिमा असलेले नगरसेवक दिलीप दातीर लहान मुलांबरोबर मनसोक्त नाचले. ते सोशल मिडीयावर टाकल्याने त्यांचे कार्यकर्ते, मित्र, नातेवाईकांत त्याची चांगलीच चर्चा झाली.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्‍चिम मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी केली. दातीर सातत्याने कोणत्या ना कोणत्या करणाने नेहमीच चर्चेत असतात. प्रभागातील भंगार बाजार हटविण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत संघर्ष केला. भंगार बाजार हटवल्यावरच ते स्वस्थ बसले. हजारो लोकांना त्यामुळे दिलासा मिळाला. अनधिकृत धर्मिक स्थळांचा प्रश्‍न, सिडकोतील घरांचे अतिक्रमण आदी नागरी समस्यांबाबत त्यांनी आजवर न्यायालयात, रस्त्यावर आणि महापालिका सभागृहात लढा दिला आहे. त्यामुळेच परिसरातील नागरीकांचा त्यांना नेहेमीच पाठींबा मिळत आला आहे. आजवर सार्वजनिक कामासाठीचा हा पाठींबा त्यांच्या आप्तस्वकीयांनी त्यांच्या व्हायरल झालेल्या 'बाला' नृत्यालाही दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT