MNS Worker Met Ajit Pawar at Nashik
MNS Worker Met Ajit Pawar at Nashik 
नाशिक

'मनसे'च्या कार्यकर्त्याला अजित पवारांनी विचारला 'हा' प्रश्न

सरकारनामा ब्युरो

नाशिक :  उपमुख्यमंत्री अजित पवार काल नाशिकच्या दौऱ्यावर होते. या व्यग्र दौऱ्यातही त्यांना भेटण्यासाठी अनेक नागरीक, विविध पक्षांचे कार्यकर्ते आले होते. यावेळी 'मनसे'च्या श्‍याम गोहाड यांनी त्यांना निवेदन देत पवार काही बोलण्याआधीच पटापट स्वतःची माहिती देत पुणे विद्यापाठीच्या केंद्राविषयी बोलण्यास सुरवात केली. तेव्हा त्याला थांबवत अजित पवार म्हणाले, "तु काम काय करतोस?'' या प्रश्‍नाने हा कार्यकर्ता थोडा चपापला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्‍याम गोहाड यांनी    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या सक्षमीकरणा संदर्भात निवेदन दिले. यावेळी खुप गर्दी होती. मात्र, या गर्दीतही पवारांनी ते निवेदन वाचले. मात्र निवेदन वाचतांनाच उत्साही गोहाड बोलत राहिले. तेव्हा शांतपणे अजित पवार म्हणाले. ''तुम्ही काम काय करता?'' हा कार्यकर्ता म्हणाला, "माझे रेसनचे दुकान होते. ऑनलाईन झाल्याने मी ते बंद केले आहे. आता कंत्राटदार होण्याच्या प्रयत्नात आहे,'' त्यावर तुझे वडील का करतात? असे पवार यांनी विचारले. तेव्हा कार्यकर्ता म्हणाला, "त्यांचे रॉकेलचे दुकान होते. शासनाने ते ऑनलाईन केल्याने त्यांनी देखील ते बंद केले.'' 

त्यानंतर अजित पवार यांनी विद्यापीठाच्या उपकेंद्राविषयी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. या दरम्यान अजित पवारांनी निवेदन द्यायला आलेल्या 'मनसे'च्या कार्याकर्त्याशी आपुलकीने विचारपूस केल्याने हा कार्यकर्ता मात्रबारावून गेला. त्यानंतर त्याने उत्साहात अनेकांना याविषयी माहिती देत आनंद व्यक्त केला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपविभागीय केंद्राचा रेंगाळलेला प्रश्‍न सोडवावा यासाठी त्यांनी निवेदन दिले. विद्यापीठ लेह- लदाख येथे उपकेंद्र सुरु करण्याचा विचार करतांना जवळच्या नाशिकच्या उपकेंद्रा विषय सुटत नाही औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाचे उस्मानाबादला तर नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाने लातूर येथे उपकेंद्र सुरु केले आहे. मात्र, नाशिकच्या उपकेंद्राला 62 एकर जागा प्रस्तावित असतांना त्याचे काम होत नाही. त्यात लक्ष घालावे अशा मागणीचा निवेदन त्यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT