Balasaheb Sanap Devyani Phrande Rahul Aher Seema Hire
Balasaheb Sanap Devyani Phrande Rahul Aher Seema Hire 
नाशिक

मंत्रीमंडळ विस्ताराविषयी नाशिक भाजपचे वेट अँड वॉच? 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : राज्य मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा जोरात आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांतून इच्छुकांनी त्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट झाल्याने वरिष्ठ नेते नाराज असल्याचे कळते. त्यामुळे नाशिकचे चारही आमदार मंत्रीमंडळ समावेषाविषयी याविषयी 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत. 

नाशिज जिल्ह्यात भाजपचे चार आमदार आहेत. महापालिका, विविध नगरपालिकांत सत्ता आहे. मात्र, मंत्रीमंडळात जिल्ह्याला प्रतिनिधीत्व नाही. यासंदर्भात गेल्यावेळी डॉ. राहुल आहेर आणि प्रा. देवयानी फरांदे यांची चर्चा होती. मात्र, विस्तार झालाच नाही. निवडणुकीपूर्वीचा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. त्यात पक्षाकडून राजकीय लाभ, हानी विचारात घेऊन प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न आहे. मात्र नाशिक शहरातुन यंदा दोन आमदारांनी चाचपणी करुन पाहिली. विशेषतः गिरीष महाजन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यामार्फत प्रयत्न झाले. मात्र, त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नसल्याचे कळते. 

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे शिवाजी सहाने यांना पाठींबा दिला होता. या निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात रणनिती आखण्याच्या सूचनाही स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, यामध्ये भाजपच्या मतांत फूट झाल्याची चर्चा आहे. त्याचा परिणाम म्हणून शिवसेना उमेदवार दराडे मोठ्या मतांनी विजयी झाले. शिवसेनेच्या पराभवासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठींबा देण्याचा राजकीय विचारधारेच्या विरोधातील निर्णय घेतला होता. पण त्याचा लाभ झाला नाही.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना ते रुचले नाही. त्यामुळेच मंत्रीमंडळाच्या विस्तारात नाशिकच्या आमदारांची काहीही चर्चा नाही. शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे हे शहरातील तर डॉ. राहुल आहेर देवळा- चांदवड मतदारसंघाचे आमदार आहे. यातील कोणीही याविषयी प्रतिक्रीया दिलेली नाही. पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील त्याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT