Rajashree Ahirrao, Saroj Ahire Sarkarnama
नाशिक

Nashik BJP Vs NCP : नाशिकच्या देवळाली मतदारसंघावरून अजित पवार गट Vs भाजपमध्ये संघर्ष

Deolali Assembly constituency : अजित पवार गटाच्या सरोज अहिरे विरुद्ध भाजपच्या राजश्री अहिरराव यांच्यात जुंपली...

Sampat Devgire

Nashik Political News :

नाशिक (Nashik) शहरातील देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपकडून दावा केला जात आहे. यावरून अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) आणि नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राजश्री अहिरराव (Rajashree Ahirrao) यांच्यात शाब्दिक वादाला सुरुवात झाली आहे.

'काही विरोधक केवळ माझे नाव घेऊन राजकारणात दिवस काढत आहेत. माझ्या नावावर त्या किती दिवस राजकारण करणार आहेत हे मला समजत नाही,' असा टोला आमदार सरोज अहिरे यांनी त्यांच्या विरोधकांना थेट लगावला आहे.

राजश्री अहिरराव यांनी अलिकडेच तहसीलदारपदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्या तहसीलदार असताना राजकारण करतात, अशा त्यांच्याविरोधात तक्रारी होत्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अहिरराव यांना कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली होती.

याशिवाय आमदार सरोज अहिरे यांनीही त्यांच्याविरोधात प्रशासनाकडे तक्रार केली होती. आता त्या उघडपणे भाजपमध्ये सहभागी झाल्या असून देवळाली मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. यावरून अहिरे विरुद्ध अहिरराव यांच्यात मतदारसंघर्ष सुरू झाला आहे.

आमदार सरोज अहिरे म्हणाल्या, राजश्री अहिरराव यांनी आता भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. भाजप हा देशातील मोठा पक्ष आहे. या पक्षात गेल्यावर त्यांच्याकडे काही कर्तृत्व असेल तर त्यांनी सिद्ध करावे. काहीतरी काम करून दाखवावे. त्यातून लोकांकडे जावे. केवळ सरोज अहिरे यांचे नाव घेऊन त्या राजकारणात किती दिवस काढणार आहेत, हेच समजत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील का, यासंदर्भात तशी शक्यता आमदार सरोज अहिरे यांनी फेटाळली. त्याचवेळी त्या म्हणाल्या, आम्ही मतदारसंघाच्या विकासासाठी अतिशय तळमळीने काम करीत आहोत. विकासकामांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे केव्हाही निवडणूक झाली तरी, देवळाली मतदारसंघातील मतदार माझ्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घ्यायची असल्यास आधी विधानसभेत तसा ठराव करावा लागेल. आजपर्यंत असा कोणताही ठराव विधिमंडळात झालेला नाही. तसा ठराव करायचा असल्यास अधिवेशन घ्यावे लागेल. त्यामुळे निवडणुका एकत्र होण्याची शक्यता नाही, असे आमदार सरोज अहिरे यांनी स्पष्ट केले.

(Edited by Avinash Chandane)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT