Suresh Jain
Suresh Jain 
नाशिक

कारागृह अधिक्षक पेचात; सुरेश जैन घेतात रोज दहा गोळ्या; त्यांना ठेवावे कुठे? 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : जळगाव घरकुल प्रकरणात अडतीस जणांना शिक्षा झाली. यातील बहुतांश प्रतिष्ठीत राजकीय व्यक्तीमत्त्वे व साठीच्या घरातील व्यक्ती आहेत. या सर्वांना काल येथील मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले. सुरेश जैन यांना रोज दहा गोळ्या घ्याव्या लागतात. त्यामुळे कारागृह प्रशासनापुढे त्यांना कुठे ठेवावे हा नवा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी मंत्री सुरेश जैन, आमदार चंद्रकांत सोनवणे, जगन्नाथ वाणी, प्रदीप रायसोनी यांसह सर्व अडतीस जणांना काल सायंकाळी नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले. यातील बहुतांश आरोपी साठीच्या पुढील आहेत. राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्ती आहेत. त्यांच्यातील अनेकांना विविध प्रकारचे आजार असल्याने त्यासाठी ते औषधोपचार घेतात. विशेषतः सुरेश जैन ऐंशी वर्षाचे असून त्यांना रोज दहा गोळ्या घ्याव्या लागतात असे समजते. 

त्यामुळे या सगळ्यांना काल 'कॉमन पॅसेज' असलेल्या कक्षात ठेवण्यात आले. या सर्व 'व्हीआयपी' लोकांना कारागृहात नेहेमीच्या कैद्यांसमवेत ठेवणे अडचणीचे आहे. यातील सर्वच जणांनी जामीनासाठी वरिष्ठ न्यायालयात अर्ज केले आहेत. त्यामुळे या कैद्यांना ठेवायचे कुठे? असा प्रश्‍न कारागृह प्रशासनापुढे पडला आहे. त्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. आज सायंकाळी त्याबाबत विचारविनिमय करुन त्यांना बक्कल क्रमांक, कारागृहाचे कपडे आणि अन्य वस्तू दिल्या जातील, असे विश्‍वसनिय सुत्रांनी सांगितले. सध्या तरी त्यांना कोणत्याही बराकीत ठेवण्यात आलेले नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT