nashik ncp mla dilemma
nashik ncp mla dilemma  
नाशिक

नाशिकचे आमदार बनकर आणि झिरवाळ तर अजितदादांच्या शपथविधीला

संपत देवगिरे

नाशिक ः अजित पवारांच्या शपथविधीची बातमी येताच नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का बसला. सर्व पदाधिकाऱ्यांच्या दूरध्वनीवर `नो रिप्लाय` येत होता. तर इतरांना काय बोलावे हा प्रश्‍न पडला होता. तासाभराने यातुन सावरल्यावर आमदारांची जमवाजमव सुरु केली. त्याचे केंद्र बनले भुजबळ फार्म. मुंबईकडे निघालेल्या नितीन पवार यांना शहापुरजवळ पक्षाच्या ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांनी `प्रोटेक्‍शन` देऊन बरोबर घेतले.

आज सकाळी आठला राज भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पावर यांच्या शपथविधीला नाशिकहून दिलीप बनकर आणि नरहरी झीरवाळ हे दोन आमदार उपस्थित होते, असे खात्रीशीर वृत्त आहे. माणिकराव कोकाटे यांचा दूरध्वनी "कव्हरेज क्षेत्राबाहेर' असल्याचा संदेश येत होता. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहा आमदार आहेत. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, सरोज अहिरे, नितीन पवार, नरहरी झीरवळ, दिलीप बनकर आणि माणिकराव कोकाटे यांचा समावेष आहे. यातील श्री. झीरवळ आणि बनकर हे शपथविधीला उपस्थित असल्याचे कळते. त्यामुळे उर्वरीत तीन आमदार पक्षाबरोबर आहेत. श्री. कोकाटे नॉट रिचेबल आहेत.

आज सकाळी आठला शपथविधी झाल्याच्या बातम्या आल्यावर अनेकांना त्यावर विश्‍वासच बसला नाही. त्यानंतर पक्षाचे पदाधिकारी त्याची खातरजमा करण्यात व्यस्त झाले होते. याची खातरजमा झाल्यावर पक्षाने तातडीने पावले उचलत आणदारांची जमवा जमव करण्याच्या सुचना स्थानिक नेत्यांना दिल्या. नाशिकमध्ये त्याचे केंद्र अर्थातच भुजबळ फार्म होते. माजी उपमुख्यमंत्री छगनभुजबळ मुंबईत होते. त्यामुळे माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्याची सुत्रे हलवली. सरोज अहिरे यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांना बरोबर घेण्यात आले. नितीन पवार सकाळीच मुंबईकडे रवाना झाले होते. शपथविधीच्या बातम्या आल्या तेव्हा ते कल्याणजवळ होते. त्यांनी आपली भूमिका काहीही ठरलेली नाही असे "सरकारनामा'ला सांगीतले. त्यानंतर श्री. भुजबळ यांनी संपर्क केल्यावर त्यांना ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी प्रोटेक्‍शन देऊन बरोबर घेतले. सध्या जिल्ह्यातील सहापैकी तीन आमदार पक्षाबरोबर आहेत. श्री. कोकाटे यांचा संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT