MLA Devyani Phrande Observed Fast on BJP Anniversary
MLA Devyani Phrande Observed Fast on BJP Anniversary 
नाशिक

...यासाठी केला भाजप आमदार देवयानी फरांदेंनी आज उपवास!

सरकारनामा ब्युरो

नाशिक : आज भारतीय जनता पक्षाचा चाळीसावा वर्धापन दिन आहे. या पार्श्‍वभूमीवर आज आपल्याला "कोरोना'शी मुकाबला करणाऱ्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या परिश्रम, त्यागाचा सन्मान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आज उपवास करणार आहेत. 'कोरोना'ला परतवून लावण्यासाठी आपण देखील सर्वांनी उपवास करावा असे आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी केले.

यासंदर्भात त्यांनी फसेबुकवर एक व्हीडीओ व्हायरल केला आहे. त्यात त्या म्हणतात.....आज भारतीय जनता पक्षाचा चाळीसावा वर्धापन दिन आहे. त्याच्या पूर्वसंध्येला काल प्रेदशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला दुरध्वनी केला. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश सांगीतला. देशभरात 'कोरोना'चा संसर्ग झाला आहे. त्याविरोधात सर्व शासकीय यंत्रणा, पोलिस, डॉक्‍टर्स, नर्स अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांना अनेक अडचणी येतात. अनेकदा त्यांना देखील जेवायला मिळत नाही. त्यामुळे त्यांचा त्याग लक्षात घेऊन त्याच्या सन्मानार्थ आपण एक दिवसाचा उपवास करावा, अशा सुचना पंतप्रधान मोदी यांनी केल्या आहेत. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी मला सुचना केल्या. प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच ज्या ज्याला शक्‍य असेल त्याने उपवास करावा. त्यानुसार मी आज उपवास करीत आहे. आपणही उपवास करावा असे आवाहनही त्यांनी केले.

''भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेला चाळीस व्रषे झाली. या पक्षाने दोन खासदारांपासून प्रारंभ करीत देशातील सत्ताधारी व जगातील सर्वात मोठा पक्ष असा प्रवास केला आहे. त्यासाठी असंख्य नेते, कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेच या पक्षाच्या विचारधारेवर मी मनापासून विश्‍वास ठेऊन आजवर वाटचाल केली आहे. आज भारत 'कोरोना'शी संघर्ष करीत आहेत. त्यावर आपण नक्कीच मात करु,'' असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT