Chandwad Tehsil MNS Supports BJPs Rahul Aher
Chandwad Tehsil MNS Supports BJPs Rahul Aher 
नाशिक

चांदवड मतदारसंघात 'मनसे'चा भाजपच्या डॉ. राहुल आहेरांना पाठिंबा

सरकारनामा ब्युरो

चांदवड : चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्या विजयासाठी वाटेल ते करू, हा निर्धार महायुतीतील कुठल्या पक्षाचा नव्हे तर महायुती विरोधात लढत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे. हे ऐकून मतदारसंघातही आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चांदवड तालुका अध्यक्ष संपत वक्ते यांनी भाजपचे डॉ. आहेर यांना जाहीर कार्यक्रम घेऊन पाठींबा जाहीर केला आहे. एव्हढेच नव्हे तर ते वडाळीभोई येथे झालेल्या प्रचारसभेत सहभागी झाले. यावेळी ते म्हणाले, ''या निवडणुकीत डॉ. आहेर यांना चांदवड तालुका 'मनसे' पाठिंबा देत आहे.'' उद्योजक शशिकांत जाधव, बाजार समितीचे सभापती डॉ आत्माराम कुंभार्डे, भूषण कासलीवाल, नितीन आहेर, कारभारी आहेर, विलास ढोमसे, बाळासाहेब वाघ, बाळासाहेब माळी, बबन पुरकर, शांताराम भवर आदी प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.

डॉ. आहेर यांना 'मनसे' व्यक्ती म्हणून पाठिंबा देत आहे, असे वक्ते यांनी सांगितले. पाच वर्षांत तालुक्‍यात सुरू असलेला विकासाचा झंझावात पाहता त्यांना या निवडणुकीत विजयापर्यंत पोचविण्यासाठीच मनसेचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. उपाध्यक्ष गोविंद गांगुर्डे, तालुका संघटक दिगंबर गांगुर्डे, तालुका उपाध्यक्ष सोमनाथ सोनवणे, तालुका चिटणीस तन्वीर शेख, प्रमोद गांगुर्डे, संजय गुंजाळ, ज्ञानेश्‍वर शिंदे, नितीन उशीर, शिवाजी अहिरे, दत्तात्रेय जाधव, विनोद शेळके, विकास गुंजाळ, नागेश ठोंबरे, विशाल ठाकरे, अनिल धनाईत, नाना चौधरी, खंडेराव घुले आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT