Shubhangi Patil | Satyajeet Tambe
Shubhangi Patil | Satyajeet Tambe Sarkarnama
नाशिक

Nashik News: ...अखेर नाशिक पदवीधरचं चित्र स्पष्ट; सत्यजीत तांबे,शुभांगी पाटील यांच्यासह 16 उमेदवार रिंगणात

सरकारनामा ब्यूरो

Nashik Division Graduate Constituency: अखेरच्या क्षणापर्यंत चुरस कायम राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली आहे. काँग्रेस व भाजपचा एकही अधिकृत उमेदवार नसल्यानं आता ही अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे, शुभांगी पाटील व सुभाष जंगले यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. 

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली. काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या डाँ, सुधीर तांबे यांनी माघार घेत सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यानंतर काँग्रेसनं सत्यजीत तांबे आपले उमेदवार नसल्याचं स्पष्ट केलं. यानंतर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरे गटानं पाठिंबा दिला. आता या पाठिंब्यावरुन ठाकरे गटात दोन मतप्रवाह असल्याचंही स्पष्ट झालं आहे. तर भाजप सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार का याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे.

अमोल बाळासाहेब खाडे, डॉ.सुधीर सुरेश तांबे, दादासाहेब हिरामण पवार, धनंजय क्रिष्णा जाधव, राजेंद्र दौलत निकम, धनराज देविदास विसपुते या सहा उमेदवारांनी पदवीधर मतदार संघ निवडणुकीतून माघार घेतली आहे.

तसेच रतन कचरु बनसोडे, नाशिक वंचित बहुजन आघाडी, सुरेश भिमराव पवार, नाशिक नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी, अनिल शांताराम तेजा, अपक्ष, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर,धुळे अपक्ष, अविनाश महादू माळी, नंदूरबार अपक्ष, इरफान मो इसहाक, मालेगाव जि.नाशिक अपक्ष, ईश्वर उखा पाटील,धुळे अपक्ष, बाळासाहेब रामनाथ घोरपडे, नाशिक, अपक्ष, ॲड. जुबेर नासिर शेख,धुळे अपक्ष, ॲड.सुभाष राजाराम जंगले,श्रीरामपुर, अपक्ष, सत्यजित सुधीर तांबे,संगमनेर,अपक्ष, नितीन नारायण सरोदे, नाशिक अपक्ष, पोपट सिताराम बनकर, अहमदनगर, अपक्ष, शुभांगी भास्कर पाटील,धुळे अपक्ष, सुभाष निवृत्ती चिंधे, अहमदनगर, अपक्ष, संजय एकनाथ माळी,जळगाव,अपक्ष असे एकूण 16 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत.

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ.निपुण विनायक, भा.प्र.से. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावरुन ठाकरे गटात दोन गट

काँग्रेस व भाजपचा एकही अधिकृत उमेदवार नसल्यानं आता ही लढत प्रामुख्याने अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) व शुभांगी पाटील यांच्यात होणार आहे. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली आहे.

घोलप म्हणाले, सुभाष जंगले नगर जिल्ह्यातून येतात, नगर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहेत. एक लाख मतदारांची नोंदणी केल्याचं शुभांगी पाटील खोट बोलत आहेत. सुभाष जंगले यांना पाठिंबा देण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी बोललो आहे. जंगले यांनी देखील मला मविआचा पाठिंबा मिळेल म्हणून दावा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT