Nasik NSUI
Nasik NSUI  
नाशिक

एनएसयुआयने राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कापला गाजराचा केक 

सरकारनामा

नाशिक :  राज्य आणि केंद्र सरकारच्या निषेधासाठी विविध आगळे, वेगळे आंदोलनांचा धडाका भाजप विरोधकांकडून सध्या सुरु आहे. या साखळीत येथील "एनएसयुआय' तर्फे गाजराचा केक कापुन आंदोलन करण्यात आले. 

नाशिक जिल्हा एनएसयुआयच्या वतीने मोदी व सरकारच्या चार वर्षांच्या कारभाराच्या विरोधात गाजराच्या आकाराचा केप कापून निषेध करण्यात आला.

" देशातील वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, पेट्रोल दरवाढ, गॅस दरवाढ, राफेल घोटाळा, शेतीमालाचे कोसळलेले भाव या सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. त्याऐवजी स्मारकांचे सोहळे, प्रचाराचे इव्हेंट करण्यात त्यांना अधिक रस आहे ," अशी  टीका पक्षाचे नेते आकाश छाजेड यांनी केली .

 याप्रसंगी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी नाशिक पूर्व विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष सचिन भुजबळ, प्रदेश "एनएसयुआय'चे सचिव सागर दाते, पूनम आव्हाड, कुशल लुथरा, विशाल बेंडकुळे, सागर बागुल, अल्तमष शेख, अभिषेक छाजेड, सतीश थोरात आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. 
  

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT