Pankaj Bhujbal
Pankaj Bhujbal  
नाशिक

पंकज भुजबळांच्या मतदारसंघात तीन वर्षे मिळेना तहसीलदार

संजीव निकम

नांदगाव : टंचाई आणि अडचणींना सामोरे जात असलेला नांदगाव मतदारसंघ वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. तालुक्‍यात कोट्यावधींच्या योजना मंजुर आहेत. मात्र, शासकीय कार्यालयांतुन नागरिकांना प्रतिसाद नाही. शासकीय कार्यालयांपेक्षा आमदार पंकज भुजबळ यांचे कार्यालय सतत धावते आहे. मात्र, गेल्या तीन वर्षात इथे कायमस्वरुपी तहसीलदारच मिळालेला नाही. 

प्रलंबीत प्रश्‍नांची टांगती तलवार सतत नांदगाव तालुक्‍यावर आहे. दुसरीकडे प्रशासकीय पातळीवरील उपाययोजना करणारी यंत्रणा मात्र सतत प्रभारी आहे. जनतेच्या कामासाठी कुणालाही फारसे सोयरसुतक नसल्याची तक्रार सतत विरोधकाकंडून होत आहे. त्यामुळे सध्या महसुल विभागाने नांदगावला प्रयोगशाळेचे स्वरुप दिल्याचे चित्र आहे. तालुक्‍याचा कारभार हाकणारे प्रशासक असलेल्या तहसीलदारांचे पद रिक्तच आहे. गेले तीन वर्षे ही स्थिती असल्याने नागरिकांच्या समस्या सुटण्याएैवजी रेंगाळल्याचे चित्र आहे. 

आमदार पंकज भुजबळ विविध प्रश्‍न, योजनांचा पाठपुरावा करीत आले आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत तालुक्‍यातील प्रशासकीय स्थैर्य गमावल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्या अश्विनी आहेर यांनी तक्रार केली होती. येवला आणि नांदगाव मतदारसंघ म्हणजे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांचे बालेकिल्ले संबोधले जातात. यामध्ये येवल्याच्या कामांना गती आहे. त्यात नांदगाव कमी का पडते? ही खंत आहे. नांदगावलाही गतीमान होण्याची प्रतिक्षा आहे. 

आमदार पंकज भुजबळ यांनी तहसीलदारांच्या नियुक्तीसाठी सतत पाठपुरावा व पत्रव्यवहार केला आहे. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर या नियुक्‍त्या आयोगाच्या कक्षेत आहेत. त्यामुळे विलंब होत आहे. लवकरच कायमस्वरुपी तहसीलदार मिळेल - विनोद शेलार, स्वीय सहाय्यक 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT