Mla Kishore Patil Pachora Jalgaon District
Mla Kishore Patil Pachora Jalgaon District 
नाशिक

पाचोऱ्यात 'त्या' बंडखोरांची केवळ 'मिडीया ट्रायल', भाजप शिवसेनेसोबतच :आमदार किशोर पाटील

सरकारनामा ब्युरो

जळगाव : पाचोऱ्यात बंडखोरी करून शिवसेनेविरूध्द काही जण बोलत आहेत. त्याचा भाजपशी संबध नाही, ते बंडखोर केवळ "मिडीया ट्रायल' करीत आहेत. भाजपचे सर्वपदाधिकारी,कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. "युती'ची घोषणा झाल्यानंतर ते प्रामाणिकपणे "युती'चे काम करतील असा आपल्याला विश्‍वास आहे. गेल्या पाच वर्षात आपण मतदार संघात केलेल्या कामावरच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्याला पुन्हा उमेदवारी दिली आहे, असे प्रतिपादन पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार व जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष किशोर पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना  केले.

शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच ते 'सरकारनामा'शी बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षात माझ्या कामाचा उत्कृष्ट असलेला परफॉर्मन्स तसेच विधीमंडळातील कामकाजात शंभर टक्के उपस्थिती, संघटनात्मक उत्कृष्ट काम आणि मतदार संघातील विकासासाठी उपलब्ध केलेला निधी या बळावरच आपल्याला उमेदवारी पुन्हा उमेदवारीची संधी पक्ष प्रमुखानी दिली आहे. विकासकामाच्या बळावर जनताही आपल्याला निश्‍चित पुन्हा सेवेची संधी देईल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षातर्फे होत असलेल्या बंडखोरीबाबत बोलतांना किशोर पाटील म्हणाले, की मुळातच त्यांचा भाजपशी कोणताही संबध नाही, ते केवळ 'मिडीया ट्रायल'करत आहेत. भाजपचे सर्व पदाधिकारी आपल्या आपल्यासोबतच आहेत. युतीची घोषणा झाल्यानंतर प्रामाणिकपणे ते प्रचाराचे कार्य करतील असा आपल्याला विश्‍वास आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT