नाशिक

शिवसेनेच्या राजेंद्र चारोस्करांनी भगवा फडकावत आमदार खोसकरांना दिला धक्का 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : गेली अनेक वर्षे गंगापूर गोवर्धन गट राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि विशेषतः आमदार हिरामण खोसकर यांचा घरचा गड मानला जातो. विविध निवडणुकीत त्यांना कोणीही धक्का देऊ शकले नव्हते. मात्र आज पोटनिवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र चारोस्करांनी यांनी हा गट भिरकावला. हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का आहे. 

आमदार खोसकर यांनी इगतपुरी विधानसभा मतदारसंघांतून काॅग्रेसची उमेदवारी केली होती. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून गंगापूर गोवर्धन गटाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक झाली. ती राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. छगन भुजबळ मंत्रीमंडळाच्या धावपळीत व्यस्त असल्याने स्वतः शेफाली भुजबळ तसेच काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी प्रचारासाठी हा गट पिंजून काढला होता. 
मात्र शिवसेनेने बाजी मारली.

गोवर्धन जिल्हा परिषद पोटनिवडणूकीत शिवसेनेचे राजेंद्र चारस्कर 4290 मतांनी विजयी झाले आहेत. आमदार हिरामण खोसकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या गोवर्धन गटाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (ता. १२) झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने हा गट राष्ट्रवादी कडून ताब्यात घेतला. यावेळी अपक्ष बारकू डहाळे यांची बंडखोरी निर्णायक ठरली त्यांनी 3335 एवढी मत घेतली भारतीय जनता पक्षाचे दौलत ससाणे चोथ्या क्रमांकावर राहिले.  

विजयी उमेदवार चारस्कर 4290 राष्ट्रवादी चे प्रभाकर गुम्बाडे 4053 बारकू डहाळे 3335 तर भाजपचे ससाणे याना अवघी 1617 मते पडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT