Ramdas Athavale Held up in Kasara Ghat on Sunday.
Ramdas Athavale Held up in Kasara Ghat on Sunday. 
नाशिक

रामदास आठवले कसारा घाटात अडकले, मात्र पोलिसांनी सोडवले

सरकारनामा ब्युरो

नाशिक  : केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीच्या पाहणीसाठी नाशिकला येत होते.यावेळी कसारा घाटात मोठा अपघात झाला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. पुढेही जाता येईना आणि मागेही फिरता येत नव्हते. यावेळी पोलीस मदतीला आले म्हणून त्यांची सुटका झाली.

रविवारी मुंबई आग्रा महामार्गावर कसारा घाटात अवजड ट्रेलरचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे हा ट्रेलर दहा- पंधरा वाहनांना धडक देत एका ट्रकवर आदळत थांबला. यामध्ये घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. दुपारी एकला ही घटना घडली. त्यात रामदास आठवले यांचा गाड्यांचा ताफा देखील अडकला. पुढे जाता येत नाही अन् मागेही फिरता येत नव्हते. बराच वेळ ते तिथेच अडकून पडले. 

पाऊण तासाने घोटीचे महामार्ग वाहतुक पथकाचे हवालदार तिथे पोहचले. त्यांनी त्यांच्या चालकाला माहिती देऊन कोंडी सुरळीत होणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना कसारा गावालगतच्या जव्हार फाटा या लहान रस्त्याने बाहेर काढले. घाटनदेवी लगत ते महामार्गावर पोहोचले. तेथे होटेल मानस येथे आठवले यांनी चहापान केले. त्यानंतर ते नाशिकला रवाना झाले. तेव्हा त्यांचा दौरा सुरु झाला. मात्र त्यांना खुप विलंब झाला. त्यामुळे नियोजित दौ-यात बदल करावा लागला.

यापूर्वी वाहतूक कोंडीची शरद पवार देखील या घाटात अडकले होते. तेव्हा ते वाहनांचा ताफा सोडून कसारा घाट चढून पायी आले होते. राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार होते. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री छगन भुजबळ होते. शरद पवार वाहतूक कोंडीत अडकले ही मोठी बातमी झाली. त्यानंतर भुजबळ यांनी तातडीने कार्यवाही करून महामार्गाच्या चौपदरीकरण केले. रविवारी रामदास आठवले कोंडीत अडकल्याने पवारांचा तो प्रसंग व आठवण ताजी करून गेला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT