cm thakre raut.
cm thakre raut. 
नाशिक

संजय राऊतांनी  महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणताच फडणवीसांचा नुरच बदलला !

संपत देवगिरे: सरकारनामा ब्युरो

नाशिक  : शिवसेनेचे प्रतोद खासदार संजय राऊत यांच्या भाषणातील कोट्या, चिमटे चांगलेच खसखस पिकवून गेले. यावेळी ते म्हणाले, " शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री" हे ऐकून देवेंद्र फडणवीस यांनी स्मित केले. त्यांचा नूरच बदलला. शिवसेनेना पदाधिका-यांनी मात्र टाळ्यांचा कडकडाट केला.


शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींचा मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी  येथे झाला.


यावेळी राऊत म्हणाले," आमची युती झाली आहे. कारण आम्ही जवळच होतो. लांब गेलोच नव्हतो. त्यामुळे हा नवा चित्रपट आहे. आ गले लग जा. आता एकमेकांच्या गळ्यात गळा घालावाच लागेल. कारण आम्ही कालही मैत्रीपूर्ण लढत होतो. अगदी जत्रेत हरवले लोक भेटतात. तर आम्ही जवळच होतो. आम्हीही भेटलो. एकत्र आलो. त्यामुळे आता आकडा लिहून ठेवा .  सर्व आठ जागा आम्ही जिंकू. युतीने आकडा लावला की तोच निघतो." 


ते पुढे म्हणाले, आमची मैत्री आहे. त्यात स्वार्थ नाहीत. मतलब नाही. जिथे मतलब असते तिथे दोस्ती होत नाही. आम्ही दीर्घकाळ एकत्र राहिलो. जेव्हा भाजपची कोणीही बाजु घेत नव्हते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, सामना, संजय राऊत आणि शिवसैनिक त्यांची बाजु मांडत होतो. आता इथे गोदावरी वाहते आहे. झाल गेले गंगेत बुडवून कामाला लागु या."

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार संजय राऊत, गुलाबराव पाटील, संरक्षण राज्यमंत्री डाॅ सुभाष भामरे, राज्यमंत्री दादा भुसे, राम शिंदे, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार बाळासाहेब सानप, खासदार हेमंत गोडसेंना व्यासपीठावर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT