Sharad Pawar demands Seperate Inquiry into Elgar Issue
Sharad Pawar demands Seperate Inquiry into Elgar Issue 
नाशिक

एल्गार परिषद कारवाईची निवृत्ती न्यायधिशांमार्फत चौकशी करावी :शरद पवार

सरकारनामा ब्युरो

जळगाव  : सरकार विरूध्द नाराजी व्यक्त करणे, तसेच त्याबाबत लिखाण करणे म्हणजे देशद्रोह होत नाही. एल्गार परिषदेत सरकारविरोधी वक्तव्य केल्याने तसेच लिखाण केल्याने खटले दाखल करून त्यांना तुरूगांत टाकण्यात आले आहे. त्यामुळ पोलीस कारवाईची चौकशी झालीच पाहिजे. हा तपास एनआयए कडे असला तरी राज्य सरकारने त्याबाबत निवृत्त न्यायाधीशामार्फत स्वतंत्र चौकशी करावी, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

जळगाव येथील जैन हिल्स येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार म्हणाले, "भीमा कोरेगाव दंगल आणि पुणे येथे शनिवार वाड्यासमोर झालेली एल्गार परिषद हे दोन वेगळे विषय आहेत. या परिषदेचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती पी.बी.सावंत होते, मात्र ते आजारी असल्यामुळे प्रकाश आंबेडकर अध्यक्ष झाले. या परिषदेत साहित्यकांनी व वक्‍त्याची सरकारविरोधात संताप व्यक्त केला त्यामुळे त्यांना तुरूगांत पाठविण्यात आले. ढवळे यांनी केवळ कवितेतून संताप व्यक्त केला म्हणून गावाला जाळण्याची चिथावणी दिल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.''

पवार पुढे म्हणाले, ''सरकारविरोधात लिहणे आणि बोलणे हा देशद्राह होत नाही. त्यामुळे या प्रकरणी झालेल्या पोलीसांच्या कारवाईची स्वतंत्र न्यायाधीशाची नियुक्ती करून चौकशी करण्याची गरज आहे. हा तपास एनआयकडे गेला असला तरी सरकारला चौकशी करण्याचा स्वतंत्र अधिकार आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चौकशी करण्याचा राज्याला तो अधिकार आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT