नाशिक

वाढदिवसानिमित्त दिलप बनकरांचे शक्तीप्रदर्शन, समर्थक म्हणाले..काका, भावी आमदार तुम्हीच!

सरकारनामा ब्युरो

नाशिक : दहा वर्षे झाली काका, आपण राजकीय वनवास भोगतोय. निफाडची जनता तुम्हाला विधानसभेत पाठविण्यासाठी आतुर आहे. काका भावी आमदार तुम्हीच आहात, अशा शब्दात कार्यकर्त्यांनी माजी आमदार दिलीप बनकर यांना पुन्हा एकदा लढण्यासाठी बळ दिले. बनकर यांनीही जनतेच्या पाठबळावर विधानसभेची मोहीम फत्ते करू, असा विश्‍वास कार्यकर्त्यांना दिला. 

दिलीप बनकर यांचा वाढदिवस पिंपळगाव शहर व निफाड तालुक्‍यात साधेपणाने मात्र उत्साहात झाला. सप्तशृंगगडावर सप्तशृंगी मातेला अभिषेक करून बनकर यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. पिंपळगाव बाजार समितीच्या डाळिंब लिलावाचा प्रारंभ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आला. हमाल-माथाडी कामगारांतर्फे त्यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर यानिमित्ताने बनकर यांनी राजकीय शक्तीप्रदर्शन केले. त्यासाठी शिवसेना, भाजप विरोधातील सर्वच नेत्यांची गर्दी झाली होती. शिवसेनेचे अनिल कदम यांनी निफाड मतदारसंघात हॅटट्रीक करण्यासाठी चांगलीच मोर्चेबांधनी केली आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्येक गावात बुथनिहाय यंत्रणा उभारणीत आघाडी घेतली आहे. त्या जोरावर बनकर यांची तयारी सुरु आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी निवडणूकीची तयारी म्हणून चांगलेच शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला. 

यानिमित्त दुपारी स्वर्गीय बनकर पतसंस्थेत ते कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपस्थित होते. तालुक्‍यात हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला. विधानसभेत निफाडचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज व्हावे, अशा शुभेच्छा कार्यकर्त्यांनी दिल्या. बनकर यांनीही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग या वेळी फुंकले. माजी आमदार शिरीष कोतवाल, कादवा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते हंसराज वडघुले, जिल्हा परिषद सदस्य दिगंबर गिते, सुभाष कराड, हेमंत जाधव, सोमनाथ बोराडे, संजय मोरे, साहेबराव मोरे, विठोबा फडे, सोमनाथ मोरे, राजेंद्र डोखळे, सोहनलाल भंडारी, जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, विश्‍वास मोरे आदी नेते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT