Hemant Godse
Hemant Godse 
नाशिक

आजचा वाढदिवस... हेमंत गोडसे, खासदार, नाशिक

संपत देवगिरे

श्री. गोडसे यांची कारकीर्द मनसेचे पहिले जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरु झाली. एकलहरे गणातून त्यांनी शिवसेनेचे शंकरराव धनवटे यांचा पराभव केला होता. २००९ मध्ये त्यांनी मनसेतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी केली. तेव्हा त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यानंतर ते महापालिकेत नगरसेवक झाले. २०१४ आणि २०१९ मध्ये ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार झाले.    

पश्चिम वाहिनी वैतरणा नदीचे अरबी समुद्राला जाणारे पाणी नाशिक जिल्ह्यात वळण व नदीजोड लिंक योजनेच्या माध्यमातून सिन्नर परिसराला मिळावे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यातून देवनदी पिंजाळ लींक योजनेला प्रशासकीय मंजूरी मिळविण्यात ते यशस्वी झाली. 

नाशिकच्या उड्डानपूलाचा विस्तार के. के. वाघ महाविद्यालयापासून ते आडगाव पर्यंत करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. सध्या हे काम पूर्णत्वास आले आहे. विविध कामांचा पाठपुरावा व पत्रव्यावहार हे त्यांचे वैशिष्ठ्ये आहे. त्यातून ते सातत्याने बातम्यांत झळकत असतात.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत देशपातळीवर खासदार निधीतील एक कोटींचा निधी कोरोना विषयक उपाययोजनांसाठी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. तेव्हा श्री. गोडसे यांनी हा निधी थेट जिल्हा रुग्णालयाला दिला. त्यातून कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली. त्यामुळे चार दिवसांनी मिळणारे कोरोना चाचणीचे अहवाल एका दिवसात मिळू लागले. त्याचा जनतेला लाभ झाला. शहरात एक महत्वाची सुविधा उपलब्ध झाली. 

यासंदर्भात `गव्हर्न आय` संस्थेने केलेल्या ५४५ खासदारांपैकी गोडसे यांना देशात सहावा तर राज्यात पहिला क्रमांक मिळाला होता. त्यांच्या प्रयत्नातून नुकतेच नाशिक केंद्रीय लोकसेवा आयोगाचे केंद्र मंजूर झाले. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वेलनेस केंद्र देखील मंजूर झाले आहे. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT