Hiraman Khoskar & Ajit Pawar Sarkarnama
नाशिक

Trimbakeshwar Land Dispute: अजित पवारांचा आमदार फडणवीसांची वाढवणार डोकेदुखी! केली पाचपट भरपाईची मागणी

Farmers Protest Land Acquisition for Kumbh Mela Road: शेतकऱ्यांची अनावश्यक जमीन ताब्यात घेऊन एनएमआरडीएने अन्याय केल्याची तक्रार

सरकारनामा ब्यूरो

Trimbakeshwar land dispute : कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत 100 मीटर परिसर मोकळा केला जात आहे. त्यात शेतकऱ्यांची स्वतःच्याच जमिनीतली घरे आणि बांधकामे पाडली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर शहरात कुंभमेळ्यासाठी रस्ता होणार आहे. त्या ठिकाणी एनएमआरडीए संस्थेने रस्त्याच्या दुतर्फा 45 मीटर हा नियम केला आहे. मात्र महापालिका हद्दीपासून १२ किलोमीटर १०० मीटर रुंद जमीन मोकळी केली जात आहे, हे तातडीने थांबविण्याची मागणी आमदार हिरामण खोसकर यांनी केली.

खोसकर म्हणाले, कुंभमेळ्यासाठी घोटी ते पेंगलवाडी हा रस्ता केला जाणार आहे. त्या 51 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी देखील 45 मीटर भूसंपादन होत आहे. त्यामध्ये काही गावांतील घरे देखील पाडण्यात येतील. आदिवासी आणि शेतकऱ्यांना अशा प्रकारे त्रास देणे योग्य नाही. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेल्या आठवड्यात भेट झाली होती. परिसरातील शेतकऱ्यांनी दिवाळी देखील साजरी केली नाही. दिवाळीत हे शेतकरी रस्त्यावर बसून आंदोलन करीत होते.

येथे अत्यंत विदारक स्थिती आहे. बाबतची सविस्तर कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घातले आहे. भूसंपादन करून आणि योग्य मोबदला देऊन जमिनी घेतल्या जातील असे त्यांनी सांगितले. या भागात आदिवासी आणि मागास परिसर असल्याने जमिनींचे शासकीय मूल्यांकन अत्यंत कमी आहे. त्यामुळे सरकारी नियमाप्रमाणे तिप्पट भरपाई अत्यंत कमी ठरेल. त्याने शेतकरी आणि आदिवासींचे भले होणार नाही, असा दावा आमदार हिरामण खोसकर यांनी केला.

समृद्धी महामार्गाला जो नियम लावण्यात आला तोच नियम त्र्यंबकेश्वर रस्त्यासाठी देखील लावण्यात यावा. मिळण्यासाठी कुंभमेळ्यासाठी 100 मीटर जमीन रिकामी करण्यात येणार आहे. त्यासाठी किमान पाचपट भरपाई मिळाली पाहिजे. यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस त्यासाठी निर्णय घेतील असा विश्वास खोसकर यांनी व्यक्त केला.

कुंभमेळ्यासाठी रस्ता मोकळा करण्यासाठी शेकडो घरे आणि इमारती बाधित होत आहेत. त्यामधी रुपये खर्च करून बांधलेली ही बांधकामे पाडली गेली आहेत. आज या संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि अधिकारी पाहणी करणार होते. शेतकरी त्यांच्या वाटेकडे सकाळपासून डोळे लावून बसले आहेत. मात्र, संध्याकाळपर्यंत कोणीही आले नाही. या पार्श्वभूमीवर आमदार खोसकर यांना आपली मागणी पुन्हा एकदा रेटली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT