नाशिक

नाशिकमध्ये युवकांची "वॉक अगेन्स्ट पेट्रोल दरवाढ' पदयात्रा 

सरकारनामा ब्युरो

नाशिक ः पेट्रोल, डिझेलच्या रोज वाढणाऱ्या दरवाढीची झळ सर्वांनाच बसत आहे. त्याविरोधात राजकीय पक्षांची आंदोलनेही सुरु आहेत. मात्र आज सोशल मिडीयाचा वापर करीत युवकांनी त्याविरोधात "फ्लॅशमॉब'चा उपयोग केला. त्याद्वारे राजकीय पक्षांची जोडे बाहेर ठेवत एकत्र आलेल्या युवकांनी सरकार विरोधात घोषणा देत रॅली काढली. 

नाशिकच्या युथ कोऑर्डीनेशन कमिटीतर्फे गेले चार दिवस पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात सोशल मिडीयावर जनजागृती करीत नागीरकांना त्याविरोधात आवाज उठविण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्या अनुषंगाने आज सकाळी दहा लशहरातील कॅनडा कॉर्नर भागात युवक जमा होण्यास सुरवात झाली.

साध्या कागदांवर दरवाढीचा व राज्य सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा लिहिल्या होत्या. त्यानंतर या युवक व युवतींनी शरणपुर रोडने मध्यवर्ती बस स्थानकाकडे ही रॅली निघाली. त्यात सहभागी झालेल्या युवतीही मोठ्या प्रामणात घोषणा देत होते. 

बेरोजगारीने पछाडलेल्या युवकांना इंधन दरवाढीची मोठी झळ बसत आहे. या दरवाढीने महागाईला निमंत्रण मिळाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने निवडमुकीपुर्वी केलेली घोषणेची आठवण ठेवावी असे आवाहन करण्यात आले.

यावेळी भूषण काळे, समाधान भारतीय, प्रसाद देशमुख, स्वप्नील घीया, सदाशिव भणगे, सुरेश नखाते, विश्‍वास वाघ, अभिजिय गोसावी, समाधान बागुल, प्रफुल्ल वाघ, विक्रमगायधनी, यश बच्छाव, अमोल गोरडे, योगेश कापसे, राजेश साबळे यांसह विविध युवकांनी सह्या केलेले पत्रक काढण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT