Apporva Hirey
Apporva Hirey 
नाशिक

सिडको, सातपुरचा कायापालट करण्यासाठीच माझी उमेदवारी : डॉ. अपूर्व हिरे

सरकारनामा ब्युरो

सिडको  : ''सरकार जनतेला खोटे आश्‍वासन देत आहे, प्रत्यक्षात काही करत नसल्याने येथील तरुणांसमोर बेरोजगारीचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सध्याचे सरकार अंबानी आणि अदानी यांच्या ताटाखालचे मांजर होऊन बसलेले आहे. नाशिकचा विकास करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या सरकारला घरचा रस्ता दाखविणे गरजेचे आहे,'' असे आवाहन डॉ. अपूर्व हिरे यांनी प्रचारसभेत केले.

सिडकोतील भाजी मार्केट, शिवाजी चौक येथे नाशिक पश्‍चिम मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार डॉ. अपूर्व हिरे यांची प्रचारसभा झाली. ते म्हणाले, ''मतदारसंघातील अंबिकानगर, कामटवाडे, सिडको, महाजननगर येथे प्रचारसभा घेतल्या. महिलांनी औक्षण करून डॉ. हिरे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. अपूर्व हिरे म्हणाले की, पेव्हर ब्लॉक बसविणे, ग्रीन जिम बसविणे अशी अनेक खोटी आश्‍वासने देणे म्हणजे विकास होत नाही. स्वतः मुख्यमंत्रीसुद्धा नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. युतीच्या सरकारने नाशिकचे प्रमुख 210 कारखाने बंद पाडल्याने नाशिकमध्ये बेरोजगारी वाढली असल्याचा आरोपही डॉ. हिरे यांनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार निवडून आल्यास नाशिकमध्ये तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून देत महिलांसाठी गृहोद्योगाची सोय करून 

या वेळी डॉ. हिरे यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी व्यासपीठावर नाना महाले, लक्ष्मण जायभावे, बाळासाहेब गिते, बाळासाहेब चंदेरी, तुपे, मुक्तार भाई, अजिंक्‍य गिते आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT