Eknath Khadse With Daughter Rohini khadse
Eknath Khadse With Daughter Rohini khadse 
नाशिक

मुक्ताईनगरात खडसेंचा करीष्मा कन्येला यश मिळवूण देणार काय?

सरकारनामा ब्युरो

जळगाव : राज्यातील विधानसभा निवडणूकीचे निकाल उद्या (ता.24) जाहीर होत आहेत. भाजप नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे रिंगणात नाहीत. परंतु त्यांची कन्या अॅड.रोहिणी खडसे मैदानात असून त्यांच्या विरूध्द शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना राष्ट्रवादी कॉंगेसने पाठींबा दिला आहे. मात्र, तब्बल सहा वेळा निवडून आलेले खडसे यांचे मतदार संघात वर्चस्व आहे. त्यांचा करिष्मा कन्येला यश मिळवून देणार काय? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.

खडसे मुक्ताईनगर मतदार संघातून भाजपतर्फे तब्बल सहा वेळा निवडून आले आहेत. मात्र, यावेळी पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली नाही. त्यांच्या ऐवजी कन्या अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारी दिली आहे. त्या जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षाही आहेत. मात्र, राजकीय जीवनात त्या पहिलीच निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या विरूध्द शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनीच बंडखोरी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठींबा जाहीर केल्याने यामतदार संघात चुरस वाढली आहे. 

या मतदार संघात मराठा समाजाचे मतदान अधिक असल्याने पाटील यांची त्या मतासह शिवसेनेच्या व राष्ट्रवादीच्या मतांवर मदार आहे. ही मते त्यांना मिळवून यावेळी पाटील बाजी मारणारअसल्याची चर्चा आहे. तर दुसकरीकडे मतदार संघात खडसे गेल्या सहा वेळेपासून निवडून येत आहेत. आजपर्यंत केलेल्या कार्यावर त्यांना मतदान मिळत आहे. त्यांचा करिष्मा त्यांच्या कन्येला लाभदायक ठरणार असून त्या मोठ्या मताधिक्‍याने विजयी होतील, असा विश्‍वासही व्यक्त होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष मुक्ताईनगर मतदार संघाकडे लागून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT