Will MNS Go With BJP in Mayor Election Who Gave Ticket to Rahul Dhikale in Nashik
Will MNS Go With BJP in Mayor Election Who Gave Ticket to Rahul Dhikale in Nashik 
नाशिक

मनसेच्या राहुल ढिकलेंना उमेदवारी देणाऱ्या भाजपला 'मनसे' स्विकारील?

सरकारनामा ब्युरो

नाशिक : महापालिकेत महापौरपदाची निवडणुकीसाठी संख्याबळाचा पल्ला गाठण्यासाठी भाजपची स्थानिक मंडळी रोज 'मनसे'चे उंबरे झिजवत आहेत. प्रारंभी यासंदर्भात मनसेतून भाजपवासी झालेले आमदार राहुल ढिकले यांनी प्रयत्न केले. मात्र, स्वतः राहुल ढिकले ऐन निवडणुकीच्या तोंडावर 'मनसे'तून भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे सध्या ते पडद्यामागे राहून भाजपच्या अन्य नगरसेवकांना पुढे करीत आहेत. भाजपचा हा प्रस्ताव गंभीर की भाजपच्या फुटीरांमध्ये चलबिचल निर्माण करण्यासाठीचा 'माईंडगेम' अशी चर्चा आहे.

भाजपचे स्थायी समिती सभापती उध्दव निमसे आणि नगरसेवक शिवाजी गांगुर्डे मंगळवारी 'मनसे' कार्यालयात गेले. यावेळी त्यांनी 'मनसे' गटनेते सलीम शेख व अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर या संदर्भात भाजपच्या या दोन नगरसेवकांनी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनाही पाठींब्यासाठी लिखीत प्रस्ताव सादर केला. प्रत्यक्षात मनसेचे प्रमुख पदाधिकारी, निर्णय प्रक्रीयेत महत्वाची भूमिका डॉ. प्रदिप पवार आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांची असते. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या गाठीभेटी, पाठीब्यांच्या बातम्या यात ते कुठेही नाहीत. 

महापौरपदाच्या संख्येच्या गणितात सध्या पुर्ण बहुमत असुन भाजपचे आठ नगरसेवक बेपत्ता आहेत. सध्या जे आहेत त्यातील काही उमेदवार कोण ठरतो त्यानंतर भूमिका ठरवण्याच्या मनस्थितीत आहेत. अशा स्थितीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक अशी प्रतिमा असलेल्या माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशा स्थितीत 'मनसे'शी फटकून वागणाऱ्या, निवडणुकीत थेट राज ठाकरे यांनाच हिणवणाऱ्या भाजपचा स्थानिक स्तरावरील सहकार्याचा प्रस्ताव गंभीर की भाजपच्या फुटीर नगरसेवकांवरील दबाव वाढविण्यासाठीचा माईंडगेम याची चर्चा आहे.

या पार्श्‍वभूमीवर आज 'मनसे'चे नगरसेवक कल्याणला सहलीसाठी रवाना झाले आहेत. राज्यात महाशिवआघाडीचा प्रयोग सुरु आहे.महापौर निवडणुक तीन दिवसांवर आली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आजपासून महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. अशा स्थितीत काय घडते, 'मनसे' भाजपला पाठींबा देणार का? राज टाकरे काय भूमिका घेतात यावर महापालिकेतील सत्तेचे चित्र स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT