Bhiwandi--Hire
Bhiwandi--Hire 
नवी मुंबई

करवसुलीत हलगर्जीपणा ;आयुक्तांनी केले 13 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित .

शरद भसाळे

भिवंडी  : भिवंडी महानगरपालिकेच्या  लिपीक पदावर काम करणा-या 13 लिपीकांना  महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी आज  तडकाफडकी निलंबीत केले. करवसुलीच्या कामात सहभागी न झाल्याने  ही कारवाई करण्यात आली आहे . 

महापालिका आयुक्तांनी 23 कर्मचा-यांची कर  वसुलीच्या कामासाठी  बदली केली . त्यापैकी 10 कर्मचारी  नियोजीत ठिकाणी हजर झाले.मात्र १३ जण नवीन कामावर हजर झाले नाहीत. त्यामळे त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई झाली . .या घटनेने पालिकेतील कर्मचा-यांमध्ये खळबळ माजली असुन त्यांचे निलंबन थांबविण्यासाठी आता काही नगरसेवकांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र आयुक्तांनी या प्रकरणी ठाम भूमिका घेतली आहे . 

भिवंडी महानगरपालिकेची आर्थिक स्थिती खालावलेली असताना पालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टी कर वसुली विभागाकडून वसुलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या करीता महापालिकेच्या आरोग्य, क्रिडा,आस्थापना व प्रभाग समिती कार्यालयासह विविध विभागात कार्यरत असलेल्या 23 कर्मचा-यांची बदली महापालिकेच्या पाच प्रभागातील वसुली विभागात करण्यात आली. परंतू 23 कर्मचा-यांपैकी 10 कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले. इतर 13 कर्मचारी हजर न झाल्याने वसुली कामावर परिणाम झाला. याबाबतीत उपायुक्त यांनी आयुक्तांना  संबंधित अहवाल सादर केला असता आज आयुक्ता मनोहर हिरे यानी तडकाफडकी 13 कर्मचाऱ्यांना निलंबीत केले . 

रविंद्र कृष्णा शिगवण(लिपीक),माणिक अंकुश जाधव(लिपीक),अशोक थेटे (लिपीक), नबी पठाण (लिपीक), अजय के.काळगावकर(लिपीक), अयुब ख्वाजा मोमीन (फिल्म प्रोजेक्ट ऑपरेटर),  सुदर्शन शेळके(वार्ड अटेंडन्ट),अरूण कृष्णा सावंत(मिस्त्री),प्रकाश काठवळे (वॉचमन), लिमाकांत म्हात्रे (लिननकिपर), विकास सोनावणो(लिपीक), सुरेश म्याना (लिपीक), आनंद तांबे(लिपीक)अशी निलंबीत कर्मचा:यांची नांवे असुन त्यांना पालिकेच्या आस्थापना विभागामार्फत नोटीसा बजावल्या आहेत,अशी माहिती प्रशासनाने दिली . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT