BJP-Eknath Shinde:
BJP-Eknath Shinde: 
नवी मुंबई

BJP-Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढवणार; बावनकुळेंनी सारवासारव का केली?

सरकारनामा ब्युरो

BJP-Eknath Shinde: आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.पण त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

बानवकुळे यांनी शुक्रवारी (१७ मार्च) भाजप महाराष्ट्र सोशल मीडिया अभ्यास्वर्गास संबोधित करताना सर्वांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 50 हून अधिक जागा लढवण्यासाठी चांगले उमेदवार नाहीत. शिवाय भाजपला शिंदे गटासह इतर मित्रपक्ष आणि अपक्षांसाठीही काही जागा सोडाव्या लागतील. तर शिंदे गटाकडे या 40 आमदार आणि काही अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांच्या जागा सोडल्या तर भाजप शिंदे गटासाठी जास्त जागा सोडणार नाही.

तसेच, विधानसभेत भाजपचे सध्या 105 आमदार असून आठ अपक्षांचा पाठिंबा आहे. राज्यातील आठ मतदारसंघात असे आहेत जिथे काही वेळा भाजपचा पराभाव झालाय तर काही वेळा विजय झालाय. या जागा धरुन या जागांची संख्या 173 होते. त्यातही शिंदे गटाकडे असलेले 12 मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघात जिंकण्यासाठी भाजपला आठ टक्के मतांची गरज आहे. भाजपकडे आधीच 43 टक्के मते असून आपल्याला 51 टक्के मतांची गरज आहे. त्यामुळे आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागा.डिसेंबर 2023 पासून तुम्हाला रात्रंदिवस काम करायच आगे. असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

अशातच बावनकुळे यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बावनकुळेंचे ही वक्तव्ये पाहता 2024 विधानसभा निवडणुकीत भाजपने 240 जागा लढवण्याची तयारी केल्याने शिंदे गटाच्या वाट्याला फक्त 48 जागा येणार आहेत.त्यामुळे आता यावर शिंदे गट काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.दरम्यान,आपल्या वक्तव्यांमुळे भविष्यात कोणता वाद उफाळू नये म्हणून मुनगंटीवार यांनी सारवासावर केली आहे.अशी कोणतीही चर्चा कोअर टीममध्ये झालेली नाही. मला याची माहिती नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्यांवरुन सारवासारव केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT