Ganesh Naik - Sanjeev Naik
Ganesh Naik - Sanjeev Naik 
नवी मुंबई

गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशाला ११ तारखेचा मुहुर्त? संजीव नाईकही भाजपमध्ये जाणार?

सरकारनामा ब्युरो

नवी मुंबई - अखेर भाजपने गणेश नाईकांचा प्रवेशाचा मुहूर्त ठरवला असून ११ तारखेला पाच वाजता  नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार हा प्रवेश होणार आहे. गणेश नाईकांसोबत माजी खासदार संजीव नाईकही यावेळी भाजप प्रवेश करणार आहेत.

राज्यातून राष्ट्रवादीची सत्ता गेल्यानंतर महापालिकेतील सत्तेच्या जोरावर भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर असलेल्या गणेश नाईकांच्या वाटेत नव-नवे अडथळे उभे रहात आहेत. पुत्र संदीप नाईक व पुतण्या सागर नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर तब्बल एक महिना लोटूनही नाईकांच्या भाजप प्रवेशाचे भवितव्य आतापर्यंत अधांतरी होते. प्रसिद्धीमाध्यमांनी दिलेल्या ९ तारखेच्या भाजप प्रवेशाचा मुहुर्त हुकल्यानंतर आता ११ सप्टेंबरला गणेश नाईक समर्थकांसहीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे सांगण्यात आले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT