नवी मुंबई

सेनेचे अनंत गिते आणि राष्ट्रवादीचे तटकरे दोघेही भाजप उपाध्यक्षाच्या दारी!

सरकारनामा ब्यूरो

वडखळ : रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती व रायगड भाजपचे उपाध्यक्ष संजय जांभळे यांची सुनील तटकरे व अनंत गिते यांनी भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार  तटकरे व युतीचे उमेदवार अनंत गिते यांच्यात लढत होत आहे. पेण तालुक्यातील मातब्बर नेते रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे सध्या प्रचारात कुठेच दिसत नाहीत. तसे त्यांची लोकसभा निवडणुकीतील भूमिका स्पष्ट झालेली नाही.

युतीचे उमेदवार अनंत गिते यांच्या पेण तालुक्यात, कळवे, खरोशी , वरसई येथे झालेल्या प्रचारसभांना जांभळे उपस्थित राहीले नाहीत. त्यामुळे गिते यांनी जांभळे यांची वडखळ येथिल त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तर सहा दिवसांपूर्वी आघाडीचे उमेदवार तटकरे यांनी देखिल  जांभळे यांची वडखळ येथे त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. तरीही त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT