Manda_Mhatre
Manda_Mhatre 
नवी मुंबई

मंदा म्हात्रेंचे आयुक्तांना पत्र आता वेदरशेडवरील कारवाई थांबणार ?  

सुजित गायकवाड

नवी मुंबई  : बेकायदा वेदरशेड उभारणाऱ्या शहरातील हॉटेल चालकांवर महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सुरू केलेल्या कारवाईला बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी विरोध केला आहे. पावासाळा सुरू असल्यामुळे व्यावसायिकांनी तात्पुरत्या शेड उभारल्या आहेत. पावसाळ्यात हॉटेल चालकांचे नुकसान होऊ नये म्हणून पालिकेने वेदरशेडवरील कारवाई थांबवावी अशी मागणी म्हात्रे यांनी मिसाळ यांच्याकडे केली आहे. मात्र हॉटेल व्यवसायिकांना शिस्त लावण्यासाठी मिसाळ यांनी सुरू केलेली कारवाई ते थांबवतील का असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

महापालिकेची सूत्रे स्विकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच शहरातील हॉटेल व्यावसायिकांना मिसाळ यांच्या आदेशानुसार विभाग कार्यालयातून विविध हॉटेल चालकांना बेकायदा वेदरशेडच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. बेलापूर, नेरूळ आणि वाशी या भागातील हॉटेलांना नोटीस देण्यात आल्या आहेत. तुर्भेतील हॉटेल चालकांना नोटीस वाटप करण्याचे काम सुरू आहे. तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी देखील पहिल्यांदा शहरातील हॉटेल चालकांनी व रहीवाशी इमारतींवर नागरीकांनी उभारलेल्या बेकायदा वेदरशेडवर कारवाई करून आपला दणका दाखवण्यास सुरूवात केली होती.

 परंतू नागरीक आणि हॉटेलचालकांवर ओढावलेल्या संकटातून सावरण्यासाठी त्यावेळी सुद्धा मंदा म्हात्रे हॉटेल चालकांच्या बाजूने धावून आल्या होत्या. मुंढे ऐकत नसल्याने म्हात्रेंनी खुद्द राज्य सरकारचा दबाव आणून अखेर ही कारवाई थांबवली होती. आता मिसाळ महापालिकेत आल्यानंतर पुन्हा त्याचीच पुरनावृत्ती होत असल्याने म्हात्रे यांनी कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे.

उलट वेदरशेड उभारण्यासाठी महापालिका जे शुल्क आकारेल ते शुल्क भरण्याची हॉटेल व्यवसायिकांची तयारी आहे. महापालिकेने ती रक्कम व्यवसायिकांकडून घेऊन त्यांना पावसाळा संपेपर्यंत तात्पुरती परवानगी द्यावी अशी मागणीही म्हात्रे यांनी केली आहे. मिसाळ यांनी महापालिकेचे कारभार पाहण्यास सुरूवात केल्यापासून पहिल्यादांच मंदा म्हात्रेंनी त्यांच्याकडे मागणी केली आहे. मात्र शहरातील व्यावसायिकांमध्ये बिघडत चाललेली शिस्त कारवाई करून लावायची असल्याने मिसाळ ही कारवाई थांबवतील का ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT