NCP-Sharad-Pawar
NCP-Sharad-Pawar 
नवी मुंबई

नाईकांचे नेतृत्व झुगारून राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट 

सुजित गायकवाड

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 11 नगरसेवकांनी गणेश नाईकांचे नेतृत्व झुगारून आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

आमदार दिलीप वळसे-पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत नवीन कार्यकारणी तयार करण्याचे तसेच पक्षाचे नवीन कार्यालय सुरू करण्याचे आदेश पवार यांनी दिल्याची माहिती नगरसेवक अशोक गावडे यांनी दिली. 

आमदार संदीप नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादीतील 52 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार अशी घोषणाबाजी केली जात होती. मात्र नाईक यांच्या प्रवेशानंतरही अद्याप राष्ट्रवादीच्या एकाही नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही.  उलट 25 नगरसेवकांनी राष्ट्रवाडीतच राहणार असल्याचे जाहीर केले आहे.  या निष्ठावान नगरसेवकांना एकत्र आणण्याचे काम अशोक गावडे यांनी केले आहे.

 शुक्रवारी शशिकांत शिंदे यांच्या घरी बैठक संपल्यानंतर आज ठरल्याप्रमाणे 11 नगरसेवकांनी मुंबईत पवारांची भेट घेतली. या भेटीत पवार यांनी जे गेले त्यांना सोडून द्या. पण जे पक्षात आहेत त्यांच्यासाठी आपण नवी मुंबईत जातीने लक्ष घालणार असल्याचे सांगितले. तसेच लवकर नवी मुंबईत कार्यकर्ता मेळावा घेणार असून या मेळाव्यात नवीन कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे सूतोवाच पवार यांनी दिले. कार्यकर्त्यांना बसण्यासाठी सीबीडी आणि सानपाडा येथील पक्षाच्या जमिनीवर नवीन पक्ष कार्यकाय तयार करण्याच्या सूचना पवार यांनी बैठकीत केल्या. 

त्या तीन जणांना अडकवले
नगरसेवक अशोक गावडे यांच्या सोबत शरद पवार यांना भेटायला नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, सुरेखा नरबागे आणि अशोक गुरखे हे देखील भेटायला येणार होते. मात्र या तिघांनाही व्हाईट हाऊस वर भेटायला बोलावून अडकवून ठेवले. त्यामुळे ते पवारांची भेट घ्यायला येऊ शकले नाही अशी माहिती गावडे यांनी दिली 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT