Panvel Corporators Violating Traffic Rules
Panvel Corporators Violating Traffic Rules 
नवी मुंबई

पनवेलच्या लोकप्रतिनिधींकडून वाहतूक नियमांचे उलंघन

गजानन चव्हाण

खारघर  : पालिकेचे अधिकारी, आयुक्त, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते व प्रभाग समिती अध्यक्ष यांनाच पालिका अधिनियमानुसार वाहनांवर पाटी लावण्याची मुभा आहे; मात्र पालिका परिसरात नगरसेवक आणि नगरसेवकाच्या नातेवाईकांच्या वाहनावर नगरसेवक पदाच्या नियमबाह्य पाट्या लावून वाहतूकिचे नियम धाब्यावर बसविल्याचे दिसून येते.

नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर राज्यातील मुख्यमंत्र्यांसह अनेक उच्च पदावरील अधिकाऱ्यांच्या वाहनांवरील लाल दिवे हटविण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधींच्या खासगी गाड्यांना केवळ पालिकेचा स्टिकर लावण्याची मुभा आहे; मात्र पनवेल पालिकेच्या विविध विषय समितींच्या सभापती आणि उपसभापती यांना वाहनांवर आपल्या पदाच्या पाट्या लावण्याचा मोह आवरता येत नसल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हेतर लोकप्रतिनिधींच्या वाहनावर नगरसेवक असे स्टिकर लावण्यात आले आहेत. 

सध्या पालिकेत भाजपचे 51 तर शेकाप 23, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 2 असे एकूण एकूण 78 सदस्य आहेत. विशेषतः बहुतांश लोकप्रतिनिधींच्या घरी एकापेक्षा अधिक वाहने आहे. प्रत्येक वाहनावर नगरसेवक असे स्टिकर लावण्यात आले आहेत. तर, काही लोकप्रतिनिधींची मुले व अन्य नातेवाईक वाहनांवर नगसेवक असे स्टिकर लावून मिरवीत असल्याचे दिसून येते.

पालिका परिशिष्ठ नियमावलीनुसार आयुक्तांसह महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व सभागृह नेते, विरोधी पक्षनेते व प्रभाग समिती अध्यक्ष यांनाच वाहनांवर पाटी लावण्याची मुभा आहे. असे असताना पालिकेस सर्व पक्षांचे पदाधिकारी वाहतूकिच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. त्यामुळे पनवेल उपप्रादेशिक परिवहन मंडळ व वाहतूक पोलिसांनी यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

महापालिका परिशिष्ठ नियमावलीनुसार आयुक्तांसह महत्त्वाच्या पदस्थांना पदाच्या पाट्या लावण्याचा अधिकार आहे. कायद्यांनुसार स्टिकर लावणे चुकीचे आहे. अश्‍या वाहनावर कारवाई करण्याचा अधिकार उप प्रादेशिक विभागाचा आहे. - प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त, पनवेल महानगरपालिका

वाहतूक नियमांच्या अनुषंगाने वाहनांवर नंबर प्लेट व्यतिरिक्त कोणतीची पाटी/ स्टिकर लावण्याचा नियम नाही. कायद्याने हा गुन्हा आहे. त्यामुळे तपास करुन कारवाई करण्यात येईल.
- हेमांगिनी पाटील, अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन विभाग, पनवेल.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT